शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: टेम्पोचा टायर फुटला अन् मृत्यूच्या दारातून परतले गोवंश; तस्करांचा निर्दयीपणा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:33 IST

टेम्पोचा टायर फुटल्याने उघड झाली जनावरांची क्रूर वाहतूक; 'टोल'च्या गाडीला पोलीस समजून तस्कर पसार

आखाडा बाळापूर: नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कुर्तडी फाट्याजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघाताने जनावरांच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. कत्तलीसाठी अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेली जाणारी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, पोलिसांच्या धाकाने तस्कर आपली आलिशान कार आणि अपघातग्रस्त वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेले.

मुक्या जिवांची छळवणूक मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक पिकअप वाहन पाच गाई आणि एका गोऱ्याला अत्यंत क्रूरपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात होते. कुर्तडी पाटीजवळ अचानक या वाहनाचा टायर फुटला आणि वाहन महामार्गावरच उलटले. या वाहनासोबत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधील (MH 12 KL 7933) लोक खाली उतरले आणि उलटलेली गाडी सरळ करून जनावरांना पुन्हा त्यात कोंबण्याचा प्रयत्न करू लागले.

एका चुकीच्या समजुतीने भामटे पळाले! हा सर्व प्रकार सुरू असतानाच जरोडा टोलनाक्याचे पेट्रोलिंग वाहन तिथून जात होते. या वाहनाच्या पिवळ्या दिव्यांना पोलीस समजून तस्करांची बोबडी वळली. पोलिसांनी आपल्याला घेरले, या भीतीने तस्कर जनावरे, पिकअप टेम्पो आणि आपली महागडी कार जागेवरच सोडून शेतात पळून गेले. काही वेळातच बाळापूरचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

मोठा मुद्देमाल जप्त बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावरून ५ गाई, १ गोरा, स्विफ्ट डिझायर कार आणि पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जमादार प्रभाकर भोंग यांच्या तक्रारीवरून तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बीट जमादार गौसोद्दीन शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli: Tempo tire burst reveals cattle smuggling cruelty, animals rescued.

Web Summary : A tempo carrying cattle for slaughter overturned near Kurtdi, exposing illegal transport. Smugglers fled, abandoning animals and vehicles fearing police. Police seized cattle, cars, and the tempo worth ₹7.85 lakhs. Investigation underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातHingoliहिंगोली