Hingoli: अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलचे झाले तुकडे, घरी परणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:05 IST2025-08-22T12:04:27+5:302025-08-22T12:05:04+5:30

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरील घटना

Hingoli: Bicycle smashed into pieces after being hit by an unknown vehicle, security guard dies on his way home | Hingoli: अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलचे झाले तुकडे, घरी परणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू 

Hingoli: अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलचे झाले तुकडे, घरी परणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू 

वसमत: रात्रपाळी करुन सायकलवर घराकडे निघालेल्या सुरक्षारक्षकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी ( दि. २२ ) पहाटे घडली. रामेश्वर विठ्ठल तपासे (वय ६०,रा चंदगव्हाण) असे मृताचे नाव आहे.

चंदगव्हाण येथील रामेश्वर विठ्ठल तपासे हे वसमत येथे एका गोदामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. रात्रपाळीचे काम संपवून तपासे आज पहाटे सायकलवरून घराकडे निघाले. पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास नांदेड -परभणी मार्गावरील ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच शहर पोलिसचे जमादार शेख नय्यर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागरिक आणि पोलिसांनी जखमी तपासे यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने चंदगव्हाण गावावर शोककळा पसरली आहे, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Hingoli: Bicycle smashed into pieces after being hit by an unknown vehicle, security guard dies on his way home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.