शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli Accident: वसमतजवळ अपघातात दोन दुचाकींचा चक्काचूर; २ ठार, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:41 IST

नांदेड आणि कळमनुरीच्या तरुणांचा जागीच मृत्यू

वसमत (जि. हिंगोली): वसमत-परभणी महामार्गावरील तेलगाव फाट्याजवळ गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नितीन नागोराव नरवाडे (२१, रा. नांदुसा, जि. नांदेड) आणि सिराज शेख उमर (४२, रा. बऊर, ता. कळमनुरी) या दोघांचा जागीच अंत झाला. धडक इतकी प्रचंड होती की, दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

दोन जण गंभीर जखमीया अपघातात सिराज यांच्या पत्नी गौसाबी शेख सिराज (४०) आणि नितीन यांचा साथीदार कपिल हाटकर (३०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिक मुखीद अफजल, सय्यद अतिफ कलंदर व इतरांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

अपघाताचा थरारएक दुचाकी वसमतच्या दिशेने येत होती, तर दुसरी परभणीकडे जात असताना तेलगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. धडक बसताच दोन्ही दुचाकींवरील चौघेही जण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. हाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Accident: Two Killed, Two Seriously Injured in Crash

Web Summary : A tragic accident near Vasmat, Hingoli, claimed two lives and left two seriously injured. The collision involved two motorcycles near Telgaon Phata. Nitin Narwade and Siraj Sheikh died instantly. Injured individuals were shifted to Nanded for advanced medical care. Police are investigating.
टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू