नर्सीत घर फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:02+5:302021-07-30T04:32:02+5:30

नर्सी येथील इंदिरानगरात शेख शबाना शेख मुखीम यांचे घर आहे. २८ जुलै रोजी रात्री त्या घराच्या दरवाजाची कडीकोंडा लावून ...

He broke into the nursery and stole Rs 70,000 | नर्सीत घर फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला

नर्सीत घर फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला

नर्सी येथील इंदिरानगरात शेख शबाना शेख मुखीम यांचे घर आहे. २८ जुलै रोजी रात्री त्या घराच्या दरवाजाची कडीकोंडा लावून झोपी गेल्या होत्या. चोरट्यांनी घराच्या आवाराच्या दरवाजा वरून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर घराच्या दरवाजा जवळील भिंतीची वीट काढून मध्ये हात घालून दरवाजाची कडीकोंडा काढला. त्यानंतर दरवाजा उघडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करीत शेख शबाना शेख मुखीम यांच्या उशाखालील सोन्याची गव्हू मण्याची एक पोत, सेवन पीस व रेडमी मोबाईल असा एकूण ७० हजारांचा ऐवज लांबविला.

याप्रकरणी नर्सी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासह श्वान पथक दाखल झाले होते. तपास सपोउपनि जाधव करीत आहेत.

Web Title: He broke into the nursery and stole Rs 70,000