टोळीने गुन्हे करणाऱ्या चौघांना केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST2021-06-03T04:21:44+5:302021-06-03T04:21:44+5:30

हिंगोली शहर हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे शेख माजीद शेख ईस्माईल, शेख जावेद शेख ईस्माईल, शेख आमेर शेख युसूफ, ...

The gang deported the four culprits | टोळीने गुन्हे करणाऱ्या चौघांना केले हद्दपार

टोळीने गुन्हे करणाऱ्या चौघांना केले हद्दपार

हिंगोली शहर हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे शेख माजीद शेख ईस्माईल, शेख जावेद शेख ईस्माईल, शेख आमेर शेख युसूफ, उवेश आयुबखान पठाण सर्व रा.तोफखाना रेल्वेस्थानक रोड हिंगोली यांच्यावर दाखल आहेत. यामुळे वारंवार प्रकरणे उद्भवत असल्याने हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपद्रव वाढला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोहेकॉ विलास सोनवणे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार २ जून रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी ३० डिसेंबर २०२० व २१ जानेवारी २०२१ रोजी वसमत शहर व हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ आरोपींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या आणखी काही आरोपींचे प्रस्ताव तयार होत आहेत. ही मंडळीही रडारवर असून याबाबतचीही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना हद्दपार केले जाण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कलासागर यांनी सांगितले.

Web Title: The gang deported the four culprits