वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST2021-02-13T04:28:43+5:302021-02-13T04:28:43+5:30

हिंगोली : वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

Four tractors transporting sand were caught | वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

हिंगोली : वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील इडोळी ते साटंबा मार्गावर केली.

वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. हिंगोली तालुक्यातील इडोळी ते साटंबा मार्गावर चार ट्रॅक्टरच्या मदतीने वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी इडोळी ते साटंबा मार्गावर पाहणी केली असता यावेळी उत्तम महादा चक्के, वैजनाथ प्रकाश डोल्हारे, कैलास परसराम करडिले, मंगेश शिवाजी डोल्हारे (सर्व रा. इंचा) वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आले. २२ लाख ८० हजार रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर, ट्रॉली व २० हजार रुपये किमतीची वाळू असा २३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात उत्तम चक्के, वैजनाथ डोल्हारे, कैलास करडिले, मंगेश डोल्हारे, नारायण डोल्हारे, बंडू कन्हेरकर, शिवाजी डोल्हारे (सर्व रा. इंचा) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंद झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, राजू ठाकूर, दीपक पाटील, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Four tractors transporting sand were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.