शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात २०३ परवाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली: जिल्ह्यात आतापर्यंत २०३ शस्त्र परवाने काढली आहेत. या शस्त्राद्वारे अजून तरी गुन्हे घडले नाहीत, अशी माहिती पोलीस ...

हिंगोली: जिल्ह्यात आतापर्यंत २०३ शस्त्र परवाने काढली आहेत. या शस्त्राद्वारे अजून तरी गुन्हे घडले नाहीत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली. शस्त्र परवाना हा स्वत:च्या संरक्षणासाठी (प्रोटेक्शन) काढला जातो. आजपर्यंत तरी काढलेल्या शस्त्राद्वारे कोणी गैरप्रकार केला नाही, असे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जे कोणी या शस्त्राचा गैरवापर करेल, त्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही पोलीस विभागाने सांगितले. जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात ६३, औंढा तालुक्यात ९, वसमत तालुक्यात ५०, कळमनुरी तालुक्यात ४९ आणि सेनगाव तालुक्यात ३२ परवाने स्व:संरक्षणार्थ काढले आहेत. शस्त्र परवाना हा जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑफलाइन अर्ज भरून काढावा लागतो. यासाठी पोलीस विभागाची परवानगी, मेडिकल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

शस्त्र परवाना काढायचा कसा?

जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी ऑफलाइन अर्ज असतो. हा अर्ज व्यवस्थितरित्या भरून द्यावा लागतो. सोबत मेडिकल प्रमाणपत्र व शस्त्र चालविण्याचे (प्रशिक्षण) प्रमाणपत्रही द्यावे लागते. यानंतर संपूर्ण शहनिशा केल्यानंतर सर्व अटी समजावून सांगून शस्त्र परवाना दिला जातो.

हिंगोली तालुक्यात जास्त, औंढा तालुक्यात कमी

जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात शस्त्र परवाना काढणारे हे ६३ आहेत तर औंढा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ९ जण आहेत. परवाना काढणाऱ्या सर्व जणांना नियम व अटी या परवाने काढतेवेळेस समजावून सांगण्यात आलेल्या आहेत.

तालुकानिहाय परवान्याची संख्या

हिंगोली ६३

औंढा ०९

वसमत ५०

कळमनुरी ४९

सेनगाव ३२

पाच वर्षात दहा परवाने

शस्त्र परवाना काढतेवेळेस ऑफलाइन अर्ज भरावा लागतो. अर्जासोबत मेडिकल प्रमाणपत्र, पोलीस विभागाचे प्रमाणपत्र, ज्यांना शस्त्र परवाना काढायचा आहे त्याचा पासपोर्ट फोटो द्यावा लागतो. पाच वर्षात नाही म्हटले तरी १० लोकांनी परवाने काढले आहेत.

शस्त्र सांभाळणे कठीण आहे...

शस्त्र परवाना काढणे सोपे असले तरी परवाना आणि शस्त्र सांभाळणे कठीण आहे. थोडी चूक केली तरी ती अंगलट येऊन काढलेला परवाना रद्द होऊ शकतो. शस्त्र परवाना काढतेवेळेस सर्व नियम व अटी परवानाधारकांना समजावून सांगितल्या जातात. जिल्ह्यात २०३ जणांनी शस्त्र परवाना काढला आहे. हे सर्व परवाने प्रोटेक्शनसाठी आहेत हे ध्यानात घ्यायला पाहिजे, असे पोलीस विभागाने सांगितले.

शस्त्र परवाण्यासाठी नियम कडक आहेत...

शस्त्र परवाना हा प्रोटेक्शनसाठी दिलेला असतो. शस्त्र चालविण्याचा परवाना आहे म्हणून त्याचा कोणी गैरवापर केला तर त्यांचा काढलेला शस्त्र परवाना रद्द केला जाऊ शकतो. शस्त्र परवान्यासाठी नियमही तसे कडक आहेत. नियमांचे पालन करणे हे परवानाधारकांचे आद्य कर्तव्य आहे.

-उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली