शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेतकऱ्यांचा टाहो ! पूर्णा प्रकल्पाचे पाणी कोणी तरी वाचवा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 18:52 IST

 वाया जाणाऱ्या पाण्याने उलट नुकसानीच्या झळा

ठळक मुद्देदरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीसहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

- चंद्रकांत देवणे 

वसमत : पूर्णा प्रकल्पाच्या दुसऱ्या पाणीपाळीतही प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. मायनरला दरवाजे न बसवताच पाणीपाळ्या देवून अधिकारी, कर्मचारी नांदेडला खुशाल राहत असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाच वर्षांत पाणी पाणी करत प्रचंड होरपळल्यानंतर आता असे पाणी वाया जात असल्याचे पाहून कोणी तरी पाणी वाचवा हो, असा आक्रोश शेतकरी करत आहेत. 

पूर्णा पाटबंधारेच्या पाण्यावर वसमतसह नांदेड, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहानभूक अवलंबून आहे. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा धरण भरल्याने आता किमान तीन वर्षे तरी पाणी कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त होत होता.मात्र आता तर विचित्र चित्र समोर येत आहे. गेल्या पाच- सात वर्षांत कालवे-चाऱ्यांतून पाणी वाहिले नसल्याने चाऱ्या, मायनर गाळ व काटेरी झुडपे, गवताने भरून गेल्या आहेत. काही मायनर जमीनदोस्त झाले आहेत. आता पाणी पाळी देण्यापूर्वी ही सर्व मायनर, वितरिका, चाऱ्यांची दुरूस्ती करूनच पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन व बेपर्वा वृत्तीमुळे कागदावरच मायनर साफ झाली. पाणीपाळी दिल्यानंतर नियोजनानुसार प्रत्येक मायनरवरून वितरिकेद्वारे शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याची जवाबदारी असते. मात्र यावेळी पाणी नियोजन काय असते? हेच माहिती नसल्यासारखी अवस्था आहे. सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडले ते वाट फुटेल तसे वाहत आहे. मायनरला दरवाजेच नाहीत. त्यामुळे मुख्य कालव्यांवर असलेल्या मायनरमधून थेट चाऱ्यांमध्ये व चाऱ्या गाळांनी भरलेल्या असल्याने थेट रस्त्यावर पाणी असे चित्र आहे. 

१५ ते २० दिवसांची पाणीपाळी देण्यात येत आहे. हे २० दिवसही पाणी नको असेल तरी शेतापर्यंत पोहोचत आहे. चाऱ्या फोडून रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. बीबीसी कालव्यावर असलेल्या जवळा मायनरला दरवाजे भसल्याने पहिल्या पाळीमधील पाण्याची प्रचंड नासाडी झाली.आता तिसऱ्यांदा पाणी आले तरीही दरवाजे नसल्याने पाणी अखंडपणे वाया जाणे सुरूच आहे. पाणी मागणी अर्ज नाहीत, शेतकऱ्यांकडून मागणी नाही. सध्या पाण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा पाणीपाळी देण्यामागचा हेतूच समजत नाही. 

आजपर्यंत पाण्याअभावी होरपळल्या गेले व आता पाणी वाया जात असल्याचे पाहून शेतकरी आचंबित आहेत. कोणी तरी पाणी वाचवा हो, असा धावा करत आहेत. मात्र पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व अभियंते नांदेडहून कारभार पाहत असल्याने वाया जाणारे पाणी पाहत हळहळ व्यक्त करण्याशिवाय पर्याय नाही. कागदावर कालवे स्वच्छ करण्यात कोणाला किती लाभ झाला, शासनाच्या तिजोरीला किती चुना लागला याचा हिशोब चौकशी झाल्यावर लागेल मात्र वाया गेलेले पाणी पुन्हा परत येणार नाही. त्यामुळे दरवाजे बसवा मगच पाणी सोडा, अशी मागणी होत आहे. असेच पाणी वाया जात राहीले तर सहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

दरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीमायनरला दरवाजे बसविण्यासाठी पूर्णा प्रकल्पाकडे पैसे नसतील तर जवळा मायनरला दरवाजा बसवण्यासाठी स्वत: खर्च करण्याची तयारी शेतकरी सुभाष भोपाळे यांनी दर्शविली. दरवाजा बसवा खर्च देतो, असा निरोप शाखा अभियंत्यांनाही दिला. तरीही तिसऱ्या पाळीला दरवाजा न बसवताच पाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ४शाखा अभियंता पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , मायनरला दरवाजे नाहीत, हे सत्य आहे. दरवाजे नसल्याने पाणी वाया जात आहे, हेसुद्धा खरे आहे. मात्र मागणी करूनही दरवाजे बसवलेले नाहीत. त्यामुळे अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वाया जात आहे हे मान्य करणारे दरवाजे न बसवता पाणी का सोडत आहेत, हे कोडे आहे. 

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती