औंढा नागनाथ तालुक्यात नापिकीस कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:18 IST2018-11-10T19:17:44+5:302018-11-10T19:18:30+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकीस कंटाळून आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

औंढा नागनाथ तालुक्यात नापिकीस कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकीस कंटाळून आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी सिताराम कराळे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या नावे अडीच एकर शेत होते.
नागेशवाडी येथील शिवाजी कराळे यांनी त्यांच्या शेतामधील घराच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली. नापिकी तसेच शेतामध्ये घेतलेल्या विहिरीचे अनुदान पैसे न भेटल्याने निराशापोटी त्यांनी आज आत्महत्या केली असे त्यांच्या परिवाराने सांगितले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.