जि.प.समोर अभियंत्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:12 IST2018-03-20T00:12:54+5:302018-03-20T00:12:54+5:30
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

जि.प.समोर अभियंत्यांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
अभियंत्यांनी यापूर्वी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलन आजपासून सुरू झाले. जि.प.तील अभियंत्यांना प्रवासापोटी दरमहा १० हजार रुपये द्या, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग निर्माण करणे, जि.प.तील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तत्काळ भरणे, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जि.प.तील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदाच्या प्रमाणात पुर्नविलोकन करणे, अभियंत्यांना अतांत्रिक कामे देऊ नये, जीवनदायी आरोग्य विमा योजना लागू करणे, कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेले परिपत्रक रद्द करावे आदी मागण्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे, सरचिटणीस रा.ना कुलकर्णी, राजाराम चंदाले, संजय सदावर्ते, देवेंद्र तुंगेनवार, प्रदीप मुळे, भास्कर लहाने, दिलीप पाईकराव, रघुनाथ तरडे, संदेश जाधव, रामेश्वर बोरकर, दासराव गिराम, एस.के.लिंबकर, अरुण अवसरमल, नितीन कोकडवार, शिवाजी पद्मने, सुहास वरूडकर, रेखा सोनटक्के आदी हजर होते.