शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ६० रूपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या दरवाढीने अगोदरच सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असताना आता खाद्यतेलाचे दरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या दरवाढीने अगोदरच सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असताना आता खाद्यतेलाचे दरही वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ३५ ते ६० रूपयांनी खाद्यतेल वाढले आहे.

पामतेलावरील आयात शुल्कात झालेल्या वाढीसह विविध कारणांनी खाद्यतेलाचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव १३० ते १४० रुपये तर शेंगदाण्याच्या तेलाचेही भाव १८० ते १९० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईत खाद्यतेलानेही ‘तेल’ ओतले असून, गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.

एरव्ही पामतेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते. त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे पामतेलाचे भाव वाढले. पामतेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहोचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचेही भाव कडाडले आहेत. अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन आवक कमी झाल्यानेही भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

अगोदरच गॅस दरवाढीने सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यात खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. परिणामी घरातील बजेट कोलमडले असून, तेलाच्या वाढत्या किमतीला ‘ब्रेक’ लावावा.

- वंदना येरेकार, हिंगोली

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीनंतर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. तेलाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.

- सीमा धुगे, सेलसूरा

गॅस दरवाढीने स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. वर्षभरात तब्बल ५५ ते ६० रूपयांनी तेल वाढले आहे.

- अनुप्रिया मगर, हिंगोली

जागतिक स्तरावरील विविध कारणांनी तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. वर्षभरात दीडपट भाववाढ झाली आहे.

- अनिरूद्ध निंगुरकर, व्यापारी.

कशामुळे झाली भाववाढ

पावसामुळे सोयाबीन, भुईमुगाच्या उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर झाला आहे.

वर्षभरात ६० रूपयांची वाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची चर्चा होत असताना खाद्यतेलाच्या किमतीचा आलेख कधी वाढला, याचा सर्वसामान्यांना पत्ताच लागला नाही. त्यामुळे वर्षभरात तब्बल ३५ ते ६० रूपयांनी खाद्यतेलाचे दर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)

तेल मार्च २०२१ मार्च २०२०

सोयाबीन १४० १०५

सूर्यफूल - १६५ १३०

शेंगदाणा - १९० १४५

तीळ २४० २००

करडई १८० १९५