कोरोनाकाळात जिल्ह्यात ७ मुले तर १७ मुली हरवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:19+5:302021-02-25T04:37:19+5:30

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ मुलगा तर ३ मुली हरवल्या. फेब्रुवारी महिन्यात २ मुले, १ मुलगी, तर मार्च महिन्यात ...

During Corona period, 7 boys and 17 girls were lost in the district | कोरोनाकाळात जिल्ह्यात ७ मुले तर १७ मुली हरवल्या

कोरोनाकाळात जिल्ह्यात ७ मुले तर १७ मुली हरवल्या

googlenewsNext

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ मुलगा तर ३ मुली हरवल्या. फेब्रुवारी महिन्यात २ मुले, १ मुलगी, तर मार्च महिन्यात २ मुले, मे महिन्यात १ मुलगी, जून महिन्यात १ मुलगी, जुलै महिन्यात १ मुलगा, सप्टेंबर महिन्यात ३ मुली, ऑक्टोबर महिन्यात ४ मुली, नोव्हेंबर महिन्यात ३ मुली, डिसेंबर महिन्यात १ मुलगा, १ मुलगी हरवली आहे. एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यांत एकही मुलगा हरवला नाही.

ही सर्व मुले १८ वर्षे वयोगटातील आहेत. मुले-मुली हरवल्यानंतर जिल्हा पालक हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘भरोसा’ केंद्रात रीतसर अर्ज देतात. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २०१८ मध्ये २० मुले तर १५ मुली हरवल्या होत्या. यामध्ये मुले सापडली असून ३ मुलींचा शोध सुरू आहे. २०१९ मध्ये १८ मुले तर २६ मुली हरवल्या होत्या. यापैकी मुले सापडली असून ३ मुलींचा शोध बाकी आहे. २०२० मध्ये ७ मुले तर १७ मुली हरवल्या होत्या. यापैकी ६ मुले सापडली असून ३ मुलींचा शोध घेणे सुरू आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. याकामी पोहेकाॅ शेख इस्माईल शेख फरीद, मपोना सुनीता शिंदे, मपोशि स्वाती डोल्हारे, मपोशि वर्षा शिंदे, मपोशि शिल्पा फटाले यांनी मदत केली.

आपल्या मुलामुलींची काळजी घेणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. जुजबी कारण पुढे करून मुला-मुलींना रागवू नये. रागावल्यास लगेच मुलामुलींचा राग शांत करून प्रेमाने त्यांच्याशी बोलावे. गर्दीच्या ठिकाणी किंवा यात्रेत मुले जास्तकरून हरवले जातात. अशावेळेस आपल्या पाल्ल्यांचा हात सोडू नये. एवढ्यावर मुलगा-मुलगी हरवल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस सदैव आपल्या पाठीशी आहेत.

-विशाखा धुळे, सहायक पोलीस निरीक्षक, ‘भरोसा’ हिंगोली

Web Title: During Corona period, 7 boys and 17 girls were lost in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.