शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, काही मद्यपी शंका उपस्थित करीत ...

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, काही मद्यपी शंका उपस्थित करीत आहेत. याबाबत थेट विचारणाही होत आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मद्यपान करावे?, आहारात काय घ्यावे व काय घेऊ नये? यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. लसीकरण व मद्यपान याचा फारसा संबंध नाही, तसेच यासंदर्भात संशोधनही झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मद्यपान करणे टाळलेलेच बरे, असे मत जाणकारातून व्यक्त होत आहे. तसेच मद्यपान करायचेच झाले तर लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर दाेन आठवडे मद्याचे अतिसेवन टाळावे. कोरोना लसीकरणामुळे रोग प्रतिकार शक्ती निर्माण होणे अपेक्षित असते. तिला अतिमद्य सेवनाने बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मद्यसेवन टाळलेलेच बरे असा सल्लाही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात झालेली दारू विक्री (बल्क लिटर)

देशी दारू -४०६८०४

विदेशी दारू -९९०९५

बीअर -६२१८९

मुळात शरीरासाठी मद्यसेवन घातकच आहे. त्यामुळे कोण्याही नागरिकांनी मद्याचे सेवन करणे टाळावेच. कोरोना लसीकरणानंतर किमान दोन आठवडे व पूर्वीही मद्य सेवन करणे टाळावे.

- डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंगोली

मद्यसेवनाने शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी मद्यसेवन करणे टाळावेच. लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे.

-राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

कुठेही ठोस निष्कर्ष नाहीत

कोरोना लस घेतल्यानंतर साधारणत: तीन आठवड्यामध्ये अँटिबॉडी तयार होतात. मद्यपान व लसीकरणाचा प्रभाव कमी होण्याबाबत कुठेही ठोस निष्कर्ष नाहीत. मात्र, अतिमद्यप्राशन केल्याने प्रतिकार क्षमता कमी होते, अशी चर्चाही नागरिकांतून होत आहे.