"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 05:57 PM2024-07-06T17:57:00+5:302024-07-06T17:57:15+5:30

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जरांगे यांनी हिंगोलीतून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Do not do injustice to the Maratha community Manoj Jarange Patil's warning to the government | "भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी हिंगोली जिल्ह्यात बोलताना राज्य सरकारला इशारा दिला. 

पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला

मनोज जरांगे पाटील म्हणाले,ज्या ज्या वेळी मराठा समाजावर संकट येतील त्या त्या वेळी हिंगोली जिल्हा ताकदीने पुढे येतो, हे या जिल्ह्याने दाखवून दिले आहे. माझं या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला सांगण आहे, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज मुलांसाठी रस्त्यावर आला आहे. एकट्या छगन भुजबळ यांचं ऐकून जर तुम्ही अन्याय केला तर याद राखा, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. 

"आरक्षण ही छगन भुजबळ यांची मक्तेदारी नाही, छगन भुजबळ यांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय केला तर २८८ पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही. सरकारनं आता शहानपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्याला आता त्रास सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारने हा आक्रोश समजून घ्यावा. जर भुजबळ यांचं ऐकून जर मराठ्यांवर अन्याय केला तर आता जसं झालं तसं पुन्हा होईल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

सरकारनं मला उघड पाडायचं ठरवलं 

  "मराठा आरक्षण शांततेत आहे. जोपर्यंत आपल्याला सहन होतंय तोपर्यंत करुया. राजकारणी लोक आपल्यात भांडण लावून देतील. काहींनी दंगली व्हाव्यात असं पेरलं आहे, पण आपण तसं होऊ द्यायचं नाही. भुजबळांनी आपल्या विरोधात अनेकांना उभं केलं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 'आता आम्ही २०० पाडू, यानंतर तुम्ही विचारच करत बसाल, असा टोलाही जरांगे यांनी लगावला. मी या समाजासाठी लढलो आहे, सरकारने मला उघड पाडायचं ठरवलं आहे. माझी समाजाला विनंती आहे, मला उघड पडू देऊ नको. मला तुमच्या पाठबळाची आणि आशिर्वादाची गरज आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले यावेळी जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले.   

Web Title: Do not do injustice to the Maratha community Manoj Jarange Patil's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.