विजेअभावी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST2021-03-22T04:26:58+5:302021-03-22T04:26:58+5:30

वाहतुकीचा खोळंबा कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर काही वाहनचालक अस्ताव्यस्तपणे चारचाकी व दुचाकी वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे ...

Crops in danger due to lack of electricity | विजेअभावी पिके धोक्यात

विजेअभावी पिके धोक्यात

वाहतुकीचा खोळंबा

कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर काही वाहनचालक अस्ताव्यस्तपणे चारचाकी व दुचाकी वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळेना

हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे भर उन्हात प्रवाशांंना हॉटेलमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे. असे प्रवाशांनी एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले; परंतु, अद्याप तरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. आगारप्रमुखांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

अवैध वाहतूक वाढली

कळमनुरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये गत काही दिवसांपासून अवैध वाहतूक वाढली आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आखाडा बाळापूर, वारंगा, डोंगरकडा, सिंदगी, पोत्रा, वाकोडी, खरवड, माळेगाव, बोल्डा आदी भागांमध्ये अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Crops in danger due to lack of electricity