Coronavirus : हिंगोलीत आणखी ३३ जणांना घरी सोडले; १० रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 08:25 PM2020-05-15T20:25:10+5:302020-05-15T20:25:49+5:30

हिंगोली : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा मागील तीन दिवसांत झपाट्याने खाली आला असून आज पुन्हा ३२ जवानांसह १ परिचारिका बरी ...

Coronavirus: 33 more released in Hingoli; Treatment continue on 10 patients | Coronavirus : हिंगोलीत आणखी ३३ जणांना घरी सोडले; १० रुग्णांवर उपचार सुरू

Coronavirus : हिंगोलीत आणखी ३३ जणांना घरी सोडले; १० रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंतच्या ९१ पैकी ८१ जण घरी सोडले

हिंगोली : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा मागील तीन दिवसांत झपाट्याने खाली आला असून आज पुन्हा ३२ जवानांसह १ परिचारिका बरी झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंतच्या ९१ पैकी ८१ जण घरी सोडल्याने आता १0 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयासोलेशन वार्डातून आज एसआरपीएफच्या ३२ जवानांसह सामान्य रुग्णालयातील १ अधिपरिचारिका बरी झाल्याने या सर्वांना आज घरी सोडले. आता फक्त १0 रुग्ण भरती असून हे सर्व एसआरपीएफचे जवान आहेत. यापैकी ९ जवान औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल आहेत. तर एकच हिंगोलीत आहे. आतापर्यंत आयसोलेशनसह जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये संशयित म्हणून १४२५ जण दाखल केले होते. यापैकी १३११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १३१६ जणांना डिस्चार्ज दिला असून सध्या १00 जण भरती आहेत. तर यापैकी २५ जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Coronavirus: 33 more released in Hingoli; Treatment continue on 10 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.