शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पावला; आठवीपर्यंतचे एक लाख ७३ हजार विद्यार्थी विनापरीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

यंदा आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळच सुरू राहिले. त्यातही पालकांची मानसिकता होईपर्यंत कोरोनाचे ...

यंदा आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळच सुरू राहिले. त्यातही पालकांची मानसिकता होईपर्यंत कोरोनाचे पुनरागमन झाले. काही ठिकाणी शाळांतच कोरोनाचा व्हायरस घुसल्याचे निमित्त झाले आणि शाळांची टाळेबंदी पुन्हा सुरू झाली. ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र, तो विद्यार्थ्यांच्या किती पचनी पडला, याचे काहीच मूल्यमापन नाही. आता मूल्यमापनाची संधीही हिरावली गेली आहे. तर, सध्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या एवढी वाढली की, आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती आहे. त्यामुळे या काळात परीक्षा होत नसल्याचा पालकांना व मुलांनाही आनंद होत आहे. मात्र, मुलांची गुणवत्ता ही बाब त्यांच्यासाठी चिंतेची बनली आहे.

एकतर शाळा पूर्णवेळ चालली नाही. ऑनलाइन शिक्षणात मुले कुठे आहेत, याची चिंता वाटते. त्यात ही परीक्षा रद्द झाली. शासनाने हा चांगला निर्णय घेतला. मात्र, संस्थांनी कमी खर्चात सगळे भागवल्याने त्यांनी शुल्कही कमी करावे, ही अपेक्षा आहे. यावरही निर्णय घेतला तर पालकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.

अभय भरतीया, पालक

यंदा कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्यच उरले नाही. शाळा नाही, परीक्षा नाही, असा आनंदीआनंद आहे. कोरोनामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो. मात्र, ऑनलाइन परीक्षांचा उपाय योजला पाहिजे होता. यात मुलांची गुणवत्ता तरी समोर आली असती.

हरीष कीर्तिवार, पालक

कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे पालक म्हणून एकीकडे परीक्षा व्हावी वाटत असले, तरीही हा योग्य व स्वागतार्ह निर्णय आहे. जसे वर्ग ऑनलाइन भरले, तशाच पद्धतीने परीक्षाही घेतल्या पाहिजे. यामुळे मुलांना परीक्षेची सवय राहील. मागील वर्षीही परीक्षा रद्द झाल्या होत्या.

सचिन बेलोकर, पालक

शासनाने परीक्षा रद्द करणे अयोग्य आहे. एकीकडे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करायला सांगितले जातात. दुसरीकडे अनेक मुले ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गच करू शकले नाहीत. त्यांना आता थेट पुढील वर्गात प्रवेश दिल्यास त्यांची शैक्षणिक हत्या केल्यासारखे शिक्षण खाते करीत आहे. अनेक गोरगरिबांची मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांना पुन्हा त्याच वर्गात शिक्षण देऊन मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

दिलीप बांगर, शिक्षण संस्थाचालक

शासनाने कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्या, हा निर्णय योग्य आहे. सध्याची परिस्थितीही तेवढी गंभीर आहे. मात्र, यामुळे गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शाळा ऑनलाइन झाल्या. काही ठिकाणी त्याही नव्हत्या. त्यामुळे गुणवत्तेबाबत मात्र चिंतेची परिस्थिती आहे.

शिवाजी पवार, शिक्षणतज्ज्ञ

पहिली -२२८५२

दुसरी -२३१८७

तिसरी-२२११२

चौथी -२१८७४

पाचवी-२१३४२

सहावी-२१०३४

सातवी-२०७४०

आठवी-२०५३५