शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औंढा नागनाथ मंदिराचे संवर्धन वाऱ्यावर; ७.५ कोटींचा निधी मंजूर; पण कंत्राटदार पसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:56 IST

संवर्धन की विद्रुपीकरण? अर्धवट राहिलेली कामे आणि पसार झालेली कंपनी; औंढा नागनाथ मंदिराचा कारभार वाऱ्यावर.

-रमेश वाहुळेऔंढा नागनाथ (जि. हिंगोली) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव भूगर्भात असलेल्या औंढा नागनाथ मंदिराचे जतन आणि संवर्धनासाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, हे काम सहा महिन्यांत अर्धवट अवस्थेत असून, काम करणाऱ्या मुंबईच्या कंपनीने पळ काढल्याची माहिती आहे. अर्धवट कामावरून मात्र भाविकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

मंदिराच्या ऐतिहासिक रचनेचे संवर्धन, पेव्हर ब्लॉक बसवणे, प्रकाश योजना आणि परिसर सुशोभीकरणासाठी हे काम मंजूर झाले होते. सुरुवातीला काही प्रमाणात प्रगती दिसली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून काम पूर्णपणे ठप्प आहे. या कामामागे आर्थिक देवाण-घेवाणीचा म्हणजेच टक्केवारीचा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीने अर्धवट काम करून हातवर केले आहेत. काही लोकांच्या आर्थिक देवाण-घेवाणीमुळे मतभेद झाल्याने कंपनीने आपली यंत्रसामग्री आणि साहित्य काढून घेतल्याचीही माहिती आहे.

विश्वस्त मंडळ नसल्याने कारभार बिघडलामंदिर संस्थानला सध्या अधिकृत विश्वस्त मंडळ नसल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. विश्वस्त मंडळाअभावी कामाच्या देखरेखीवर आणि पारदर्शकतेवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. मुंबईहून हेरिटेज कंपनीने या कामासाठी अनुभवी कामगार, अभियंते आणि साहित्य पाठवले होते; परंतु वाद टाळून केलेल्या कामाचा मोबदला घेऊन कंपनीने पुढील काम थांबवण्याचा निर्णय घेतला. जर अधिकृत विश्वस्त मंडळ असते, तर कामावर योग्य देखरेख झाली असती आणि असा आर्थिक गुंता निर्माण झाला नसता; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून विश्वस्त मंडळच नाही. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा सूर भाविकांतून पुढे येत आहे.

८९ लाखांचे बिल; पण प्रत्यक्षात काय?कंपनीने ८९ लाख रुपयांचे बिल काढले असले तरी प्रत्यक्षात मंदिर परिसरात फारसे काम झालेले दिसत नाही. काही ठिकाणी पाइप तसेच उभे केलेले आहेत आणि बाकी साहित्य कंपनीने काढून नेले आहे. अर्धवट झालेल्या कामामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.

भाविकांत नाराजीचा सूरश्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी मंदिर परिसरातील विकासात्मक, मंदिराचे जतन आणि सुशोभीकरणाचे काम अपूर्ण आहे. कोट्यवधी रुपयांचे काम मंजूर झाले होते; पण आता परिसराची अवस्था पाहून भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रशासनाकडे चौकशीची मागणीप्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंजूर झालेले काम अर्धवट असणे ही एक गंभीर बाब समजली जात आहे. आता जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी नवीन यंत्रणा उभी करावी आणि विकासकामात लुडबूड होऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभाग औरंगाबाद या कार्यालयाशी संपर्क साधला असता, काही तांत्रिक बाबीवरून हा प्रकार घडल्याचे समजते; पण औंढा येथे मात्र वेगळीच चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Aundha Nagnath Temple renovation stalled; contractor flees despite funds.

Web Summary : Renovation of Aundha Nagnath temple, funded with ₹7.5 crore, is incomplete. The contractor abandoned work amid alleged corruption, leaving devotees disappointed. Lack of a trust is blamed.
टॅग्स :Hingoliहिंगोली