वाळूची वाहतूक करणारे पाच टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:03+5:302021-05-05T04:49:03+5:30

हिंगोली शहरातून वाळूची वाहतूक करणारे टिप्पर मागील काही दिवसांपासून धावत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी टिप्पर पकडून गुन्हा ...

Caught five tippers transporting sand | वाळूची वाहतूक करणारे पाच टिप्पर पकडले

वाळूची वाहतूक करणारे पाच टिप्पर पकडले

हिंगोली शहरातून वाळूची वाहतूक करणारे टिप्पर मागील काही दिवसांपासून धावत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी टिप्पर पकडून गुन्हा दाखल केला होता. सायंकाळी सहा वाजेनंतर वाळूची वाहतूक करता येत नाही. तरीही शहरातून रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक होत आहे. दरम्यान, ४ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, जमादार शेख शकील, गजानन होळकर, दिलीप बांगर, सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने शहरातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यामध्ये नांदेड नाका येथे वाळूची वाहतूक करणारे दोन टिप्पर आढळून आले. तसेच खटकाळी रोड भागात तीन टिप्पर वाळूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी पाचही टिप्पर शहर पोलीस ठाण्यात लावले. रात्री उशिरापर्यंत टिप्पर चालकाची चौकशी सुरू होती.

Web Title: Caught five tippers transporting sand