शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

हिंगोली : शहरातून जाणाऱ्या बसस्थानक ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यानच्या डांबरीकरण कामास सुरवात झाली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. ...

हिंगोली : शहरातून जाणाऱ्या बसस्थानक ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यानच्या डांबरीकरण कामास सुरवात झाली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना याचा त्रास होत होता. खडीकरणानंतर आता हॉटमिक्सद्वारे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

पुलाचे कठडे बसवा

हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गावरील ओढ्यावर उभारलेल्या पुलावरील कठडे गायब झाले आहेत. या महामार्गाचे काम होत असले तरी या कामाची गती लक्षात घेता आणखी काही महिने काम चालणार आहे. त्यामुळे ओढ्यावरील पुलाचे कठडे धोकादायक ठरत आहेत. पुलाचे कठडे बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

बसस्थानक परिसरात धुळीचे लोट

हिंगोली : शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुशोभिकरण होत आहे. हे काम अंतिम झाले नाही. यासाठी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहेत. याच ठिकाणी बसेस उभ्या राहत आहेत. मात्र, बस आल्यानंतर बसस्थानक परिसरात धुळीचे लोट निर्माण होत आहेत. याचा प्रवाशांना त्रास होत असून डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात पाणी शिंपडावे, अशी मागणी होत आहे.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी सुटत आहे. याचा त्रास कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना होत आहे. याकडे लक्ष देऊन स्वच्छतागृहाची साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीची होतेय कोंडी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. रेल्वे आल्यानंतर गेट बंद केले जाते. मात्र, रेल्वे गेल्यानंतर गेट उघडले असता एकाच वेळी वाहने धावत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव

हिंगोली : जिल्हाभरात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पीक घेतले आहे. सध्या पीक बहरले असले तरी सध्या अनेक ठिकाणी हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. दरम्यान, पीक चांगले आले तर रब्बी हंगामातील झालेले नुकसान भरून निघेल या आशेवर शेतकरी आहेत.

विनाक्रमांकाच्या वाहनांची धूम

हिंगाेली : शहरात मागील काही दिवसांपासून विनाक्रमांकाची वाहने धावत आहेत. तसेच ही वाहने जोरात चालविली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील अनेक भागातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. बंद पडलेले पथदिवे काढून त्या ठिकाणी नवीन पथदिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

खड्डे बनले धोकादायक

हिंगाली : कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील मोरवाडी परिसरात मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, पुन्हा खड्डे ‘जैसे थे’ झाले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

ओढे, नाले आटले

हिंगोली : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. ओढे, नदी, नाले ओसंडून वाहत होते. त्यामुळे अनेकांनी बागायती पिके घेतली आहेत. ओढ्यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली असून आता ओढे कोरडे पडले आहेत. तलावातीलही पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

वेगळी सिंगल बातमी घ्यावी. सोबत फोटो १० नंबरचा आहे.

ग्रंथ निवड समितीवर खंडेराव सरनाईक

हिंगोली : ग्रंथ निवड समितीच्या पुनर्रचनेबाबतचा शासन निर्णय बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये राज्य ग्रंथालय संघाच्या औरंगाबाद विभागीय प्रतिनिधी म्हणून खंडेराव सरनाईक यांची निवड करण्यात आली आहे.

येथील खंडेराव सरनाईक हे गेल्या ३४ वर्षांपासून ग्रंथालय चळवळीत काम करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्यावतीने त्यांची ग्रंथ निवड समितीच्या औरंगाबाद विभाग सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र २० जानेवारी रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने काढण्यात आले आहे.