शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

सहजतेने एक हजारापर्यंत पाढे म्हणणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

हिवरा तर्फे जवळा येथील प्रल्हाद लोणे यांचे वय ५० आहे. ते चौथीत असताना वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना शाळा, रोजमजुरी ...

हिवरा तर्फे जवळा येथील प्रल्हाद लोणे यांचे वय ५० आहे. ते चौथीत असताना वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना शाळा, रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागला. त्यांची वेगळी ओळख म्हणजे ते एक हजारापर्यंतचा पाढा सहजतेने म्हणतात. पाढा म्हणताना सहजतेने पाढ्यातील पुढची संख्या तोंडात येत असल्याचे ते म्हणाले. मोबाइल क्रमांक एकदा कोणी सांगितला की, दीर्घकाळ स्मरणात राहतो. त्यांची अंकातील स्मरणशक्ती दांडगी असून, त्या संबंधीची गोष्ट ते विसरत नाहीत. एकदा मोबाइल नंबर सांगितल्यास त्यांना हा नंबर तोंडपाठ होतो. ही त्यांची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यास मदत हाेत आहे. प्रल्हाद लोणे यांना मुलगा, दोन मुली असून, मुलीचे लग्न झाले. मुलगा बीसीएसचे शिक्षण घेत आहे.

डोंगरकडा येथे ८ ते १० दिवसांपूर्वी प्रल्हाद लाेणे हे हरभरा विकण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांचा पाढा म्हणण्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ बहुतांश जणांनी पाहिला असून, प्रत्येक जण त्यांच्या सहजतेने म्हणत असलेल्या पाढ्याची व ज्ञानाची अनेक जण स्तुती करीत आहेत.

पाढे येत असून ते गणितीय आकडेमाेड सहजतेने करतात. शिक्षण कमी झाल्याची खंत मात्र त्यांनी व्यक्त केली. कोणताही पाढा म्हणतात तेव्हा पुढची संख्या आपोआप तोंडी येते याबाद्दल विचारले असता, ही कोणती शक्ती अथवा कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. एक हजारापर्यंत सहजतेने पाढे येत असल्याने शासनाने याची दखल घेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाढे अवगत व्हावेत व अंकगणित सहजतेने सोडविता यावे यासाठी माझ्याकडून ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्यास विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

फाेटाे नं. ०५