शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २९ हजार बांधकाम कामगारांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ ...

हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मात्र अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यात सर्वांत जास्त हेळसांड हातावर पोट असणाऱ्या कामगार, मजुरांची झाली. बांधकामे ठप्प असल्याने उपासमार वाढली होती. त्यामुळे शासनाने बांधकाम कामगारांना लॉकडाऊनकाळात अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक कामगारांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या.

कार्यालयाने पुरेशी जनजागृती केली नसल्याने अनेकांना तर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती नव्हती. त्यामुळे अनेक खरे कामगार नोंदणीपासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे कामगारांसाठी फायदेशीर ठरणारा अर्थसहाय्याचा लाभ मोजक्याच खऱ्या कामगारांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या - ४३३०७

लाभ मिळालेले कामगारांची एकूण संख्या - २९२९९

दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार - ३१८८

लॉकडाऊन काळात बांधकामे ठप्प झाल्याने हाताला काम नव्हते. हातऊसने पैसे घेऊन संसाराचा गाडा चालविला. कामगार कार्यालयाकडून अर्थसहाय्य मिळत असल्याचे समजल्याने अर्ज सादर करण्यासाठी गेलो होतो. मात्र दोन दिवस रांगेत उभा राहूनही अर्ज सादर करू शकलो नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले.

- बाबूराव मोरे, अंभेरी

लॉकडाऊन काळात कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागली. लॉकडाऊन काळात देणारे अर्थसहाय्य मिळावे यासाठी कामगार कार्यालयात नोंदणीसाठी गेलो होतो. मात्र पुरेशी कागदपत्रे नव्हती तसेच लॉकडाऊन काळात कागदपत्रे काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले.

-किशन पाईकराव,

३१८८ कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील लाभाची प्रतीक्षा

येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात ५३ हजार ८८२ विविध कामगारांनी नोंदणी केली आहे. मात्र, अनेकांनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे ४३ हजार ३०७ कामगार विविध लाभासाठी पात्र ठरले. त्यात २९ हजार २९९ बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांचे तर २६ हजार १११ कामगारांना ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले. अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

कामगार अधिकारी नॉट रिचेबल

येथील जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे इतर जिल्ह्यांचाही पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीकडील पदभार सांभाळताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहत नसल्याचे चित्र आहे. कामानिमित्त येणाऱ्या कामगारांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यासंदर्भात कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया समजू शकली नाही.