शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत धान्याची आवक घटली; दरही घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

२०२०-२१ या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तुरीच्या उत्पादनातही घट झाली. आर्थिक गरज ...

२०२०-२१ या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तुरीच्या उत्पादनातही घट झाली. आर्थिक गरज असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी कमी दरातही शेतमाल विक्री केला. त्यानंतर मात्र सोयाबीन, हरभरा, तूर, हळद या पिकांच्या दरात वाढ होत गेली. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत दरवाढ कायम होती. मात्र, शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी जपून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी काढण्यास सुरुवात करताच शेतमालाचे दर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुना मोंढा मार्केट यार्डात सोमवारी गव्हाला २४०० ते १८०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच टाळकी १७०० ते २००० रुपये, हरभरा ४८०० ते ५२००, हायब्रीड ९०० ते ११००, तूर ६३५० ते ६७२५, सोयाबीन ६४०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत होते, तर श्री संत नामदेव हळद मार्केट यार्डात हळदीला ६ हजार ५०० ते ७४०० रुपये भाव मिळाला.

शेतकरी म्हणतात...

खरीप हंगामातील खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतमाल जपून ठेवला होता. मात्र, दरात घसरण झाल्याचे लक्षात येताच काही शेतमाल तसाच ठेवून दिला आहे. केवळ तूर विक्रीसाठी आणली आहे. मात्र, येथे आल्यानंतर भावात घसरण झाल्याचे पहावयास मिळाले. आता कमी दरातही तूर विक्री करावी लागणार आहे.

- विकास इंगळे, शेतकरी.

शेतमालाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा शेतमालाच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करण्याचे थांबविले आहे. मंगळवारी हरभऱ्याला ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

- नागोराव जाधव, शेतकरी

व्यापारी म्हणतात...

लॉकडाऊनमुळे येथील खरेदी केलेला माल बाहेर राज्यात जात नसल्याने आर्थिक चक्र थांबले आहे. व्यापाऱ्यांकडे खेळता पैसा शिल्लक राहिला नसल्याने शेतमालाच्या दरात घसरण झाली आहे.

- प्रशांत सोनी, व्यापारी

येथील जुना मोंढा भागातील मार्केट यार्डात तूर, सोयाबीन, गहू, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी येत आहे. हळदीचे मार्केट दिवसाआड सुरू असून हळदीला सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

- नारायण पाटील, सचिव, कृउबा, हिंगोली.