शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये मायलेकीची हत्या केलेल्या आरोपीची हिंगोलीतील मुळगावी आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:57 IST

Murder accused's suicide at Hingoli पनवेल येथे लग्न करण्यास नकार दिल्याने सुरेखा बलखंडे व सुजाता बलखंडे या माय लेकीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली होती.

ठळक मुद्देलग्नाची मागणी धुडकावल्याने रागाच्या भरात आरोपीचा संपूर्ण कुटुंबावर हल्ला मायलेकीचा मृत्यू झाला तर मुलीचे वडील गंभीर जखमी आहेत आरोपी फरार होऊन हिंगोली जिल्ह्यातील मुळगावी पहेनी शिवारामध्ये लपून बसला होता.

नर्सी नामदेव (जि. हिंगाेली) : पनवेल येथे मायलेकीची हत्या करून फरार झालेला आरोपी हिंगोली जिल्यातील आपल्या मुळगावी लपला होता. त्याने तालुक्यातील वैजापूर शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.  

पनवेल येथे लग्न करण्यास नकार दिल्याने सुरेखा बलखंडे व सुजाता बलखंडे या माय लेकीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेनंतर आरोपी प्रकाश यशवंता मोरे  ( २६ रा. पहेनी ता. जि. हिंगोली ) हा घटनास्थळावरून फरार होत, आपल्या मूळगावी पहेनी शिवारामध्ये लपून बसला होता. खून प्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत पहेनी शिवारामध्ये आरोपीच्या मागावर फिरत होते. परंतु रविवारी ३ वाजताच्या सुमारास या आरोपीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सिद्धार्थ बलखंडे ( रा. रुपूर ता. कळमनुरी, जिल्हा हिंगोली )  हे दापत्य काही वर्षांपासून पनवेल येथे कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले होते. प्रकाश यशवंता मोरे सुद्धा पनवेल याठिकाणी टिप्पर चालकाचे काम करीत असे, प्रकाश व बलखंडे दाम्पत्य दापोली येथील एकाच चाळीत राहत होते. दोघेही हिंगोली जिल्ह्यातील असल्याने एकमेकांना ओळखत असत. याच दरम्यान प्रकाशने सिद्धार्थ बलखंडे यांच्या मुलीस सुजाताला लग्नाची मागणी घातली होती. तसेच काही दिवसांपासून वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावत हाेता. परंतु, प्रकाशचे पहिले लग्न होऊन पत्नी बाळंतपणामध्ये मृत्यू झाल्याने सिद्धार्थ बलखंडे यांनी लग्नास नकार दिला. 

१८ फेब्रुवारी रोजी प्रकाशने लग्नाचा विषय काढला व यावेळीसुद्धा मुलीच्या वडीलाने लग्नास नकार दिल्याने प्रकाशने रागाच्या भरात धारदार शस्त्राने बलखंडे दापत्यांवर हल्ला केला. यामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर वडीलास गंभीर दुखापत झाली होती. हत्या करून प्रकाश हा घटनास्थळावरून फरार होऊन आपल्या मूळगावी पहेनी शिवारामध्ये दडून बसला होता. परंतु, रविवारी वैजापूर शिवारामध्ये माळरानावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व मुंबई पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली