शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:14 IST

व्यवसाय शाखा व्यवस्थापकाची पोलीस ठाण्यात तक्रार...

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली) : शहरातील मुथूट मायक्रोफिन लिमिटेड कंपनीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कंपनीच्या एका संपर्क अधिकाऱ्याने आठ खातेदारांकडून सुमारे ७५ हजार ५९० रुपयांची कर्जाची रक्कम हडप केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा वसमत शहर पोलिस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्याविरोधात न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला्.

वसमत शहरात आसलेली मुथूट मायक्रोफिन लिमिटेड कंपनी बचत गटांना समूह हमीवर ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवते. या कर्जाची मासिक हप्त्यांमध्ये वसुली करण्यासाठी कंपनीने प्रत्येक भागात संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. हे अधिकारी गावांमध्ये जाऊन बचत गटातील महिलांकडून कर्जाचे हप्ते गोळा करतात. त्याची गटाच्या शेरा रजिस्टरमध्ये नोंद करतात आणि नंतर ती रक्कम कंपनीत जमा करतात.

सदर घटनेतील आरोपी संपर्क अधिकारी करण साळवे (रा. परभणी) याने ५ नोव्हेंबर ते १३ जुन २०२५ पर्यंतचे खातेदारांकडून ७५ हजार ५९० रुपयांचे हप्ते गोळा केले होते. मात्र ही रक्कम त्याने कंपनीकडे जमा केली नाही. तसेच शेरा रजिस्टरमध्येही त्याची नोंद केली नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी गावात जाऊन चौकशी केली असता महिलांनी आपण वेळेवर करण साळवे याच्याकडे हप्ते दिल्याचे सांगितले. परंतु साळवेने कंपनीकडे पैसे भरले नसल्याचे कळताच महिलांनी मुथुट मायक्रोफिन फायनान्स कंपनी शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार मांडली,

व्यवसाय शाखा व्यवस्थापकाची पोलीस ठाण्यात तक्रार ...या प्रकारानंतर,मुथुट मायक्रोफिन फायनान्स कंपनीचे व्यवसाय शाखा व्यवस्थापक रमाकांत तोटावाड यांनी तातडीने २३ जुलै रोजी रात्री शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी