शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 7:16 PM

अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देकर्मचारी गरोदर राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला.

हिंगोली :  येथील पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून गर्भपात करणाऱ्या औंढा नागनाथ ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर व वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये १६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला औंढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी मुनीर इब्राहिम मुन्नीवाले याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर मागील चार वर्षांपासून ही महिला कर्मचारी ज्या-ज्या ठिकाणी कर्तव्यावर गेली, तेथे जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला.  पोलिस मुख्यालय, जवळा बाजार, औंढा येथे तिने काम केले आहे. त्यानंतर सदर महिला कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने सोमवारी रात्री उशिरा वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी औंढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी मुनीर इब्राहिम मुन्नीवालेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHingoliहिंगोली