शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पीएफएमएस प्रणालीअभावी वित्त आयोगाचे ५४ कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्ह्यातील ५६३ पैकी केवळ ५ ग्रामपंचायतींमध्ये पीएफएमएस प्रणाली असून, इतर ग्रामपंचायतींचे १४ व्या वित्त आयाेगाचे अभिलेखेच अपलोड ...

हिंगोली : जिल्ह्यातील ५६३ पैकी केवळ ५ ग्रामपंचायतींमध्ये पीएफएमएस प्रणाली असून, इतर ग्रामपंचायतींचे १४ व्या वित्त आयाेगाचे अभिलेखेच अपलोड नाहीत. त्यामुळे १५ व्या वित्त आयाेगाचे ग्रामपंचायतींनी वितरित केलेले ५४ कोटी खात्यातच पडून आहेत.

हिंगोली जिल्हा परिषदेत पीएफएमएस प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींना सेवा पुरविणाऱ्या खाजगी कंपनीकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयाेगाच्या सर्व हप्त्यांचा खर्च ऑनलाइन केल्यानंतर १५ व्या वित्त आयोगात पीएफएमएस प्रणालीवर कारभार करणे शक्य आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींची रक्कम दरवर्षी शासनाकडून एका कंपनीस दिली जात असली तरीही संगणकासह इतर व्यवस्था ही कंपनी अद्ययावत ठेवत नाही. त्यामुळे ही कामे व्हायला तयार नाहीत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामपंचायतींना मागील तीन हप्ते खर्च करता आले नाहीत. त्यापूर्वी पीएफएमएसचे बंधन नव्हते. त्यामुळे खर्च तरी करता आला. आता पीएफएमस प्रणालीवर ग्रामपंचायत कधी येणार ? यावर कुणीच बोलायला तयार नाही. सध्या जिल्ह्यातील केवळ ५ ग्रामपंचायतींनी ही सर्व माहिती अद्ययावत भरल्याने त्यांचा कारभार पीएफएमएस प्रणालीवर आला आहे. त्यामुळे या पाच ग्रामपंचायतींना आपली विविध विकासकामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर ग्रामपंचायती मात्र ही प्रणाली कार्यान्वित झाल्याशिवाय निधी खर्च करू शकणार नाहीत. त्यामुळे किरकोळ काम करायचे असले, तरी ग्रामपंचायतींसमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे.

असे आहेत तीन हप्ते

जिल्हा परिषदेला २३ कोटी रुपयांचे अनटाइडचे दोन तर टाइडचे तीन हप्ते मिळाले. या एकूण ६९ काेटी रुपयांपैकी ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला जातो. म्हणजे या तीन हप्त्यांत ५४ कोटी रुपये ग्रामपंचायतींना गेले आहेत. यात अनटाइडमध्ये ग्रामपंचायतींना त्यांच्या गरजेनुसार खर्च करता येतो, तर टाइडमध्ये केवळ पाणीपुरवठा व स्वच्छतेवरच खर्च करता येतो.

सरपंचांची बोंब

मागील अनेक दिवसांपासून पीएफएमएस प्रणालीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कधी संगणकीय यंत्रणा सांभाळणाऱ्या यंत्रणेची साथ नसते, तर कधी प्रशासनच यात रस घेत नाही. त्यामुळे गावच्या विकासाचा गाडा आम्ही हाकायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. ही समस्या लवकर सुटणे गरजेचे आहे, असे नांदापूरचे उपसरपंच संदीपान बोरकर यांनी सांगितले.

शासन नवीन आदेश काढताना काही विचारच करीत नाही. आता १४ व्या वित्त आयोगापासूनचा हिशेब ऑनलाइन केल्याशिवाय नवीन खर्च करता येत नाही. दरवर्षी आमचा दीड लाखाचा निधी घेऊन खाजगी यंत्रणा यासाठी बसविली. उरलेला निधी गावाच्या विकासावर खर्च करायचा तर या अडचणी आहेत, असे सरपंच सुजाता गुडदे यांनी सांगितले.

असे आहे जिल्ह्यात चित्र

तालुका एकूण ग्रा.पं. पीएफएमस

हिंगोली १११ १

कळमनुरी १२५ ०

औंढा १०१ ०

सेनगाव १०७ २

वसमत ११९ २