कोरोनाचे नवे १५१ रुग्ण, तर २२३ जण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST2021-05-06T04:31:58+5:302021-05-06T04:31:58+5:30

आज बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून ९६, लिंबाळा येथून ३४, वसमत येथून २३, कळमनुरीतून २७, औंढा येथून ३६, ...

151 new corona patients, while 223 were cured | कोरोनाचे नवे १५१ रुग्ण, तर २२३ जण झाले बरे

कोरोनाचे नवे १५१ रुग्ण, तर २२३ जण झाले बरे

आज बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून ९६, लिंबाळा येथून ३४, वसमत येथून २३, कळमनुरीतून २७, औंढा येथून ३६, सेनगावातून ७ अशा एकूण २२३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १३ हजार ६३७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १२ हजार ३२३ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले. सध्या १०५७ जणांवर उपचार सुरू आहेत. दाखल असलेल्यांपैकी ४४० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ४५ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

आठजणांचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात आज ८ कोरोना रुग्ण दगावले. यात जिल्हा रुग्णालयात भिंगी येथील ३५ वर्षीय पुरुष, जटाळवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, रिधोरा येथील ६५ वर्षीय पुरुष, साटंबा येथील ५५ वर्षीय पुरुष, सेनगाव येथील ४५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे; तर द्वारका हॉस्पिटलमध्ये सेलसुरा येथील ९० वर्षीय पुरुष नवीन कोविड सेंटरमध्ये साळण येथील ६० वर्षीय पुरुष व कळमनुरी येथे जाम येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 151 new corona patients, while 223 were cured