तुमच्या 'या' सवयींमुळे होऊ शकता जीवघेण्या आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:28 PM2020-01-28T17:28:24+5:302020-01-28T17:28:52+5:30

अलिकडच्या काळात जगभरात सगळ्यात जास्त हद्यविकाराच्या आजाराने मृत्यू होत असेलेल्या लोकांची संख्या अधिक आहे.

Your daily habits may be incressed risk for cancer | तुमच्या 'या' सवयींमुळे होऊ शकता जीवघेण्या आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

तुमच्या 'या' सवयींमुळे होऊ शकता जीवघेण्या आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

Next

अलिकडच्या काळात जगभरात सगळ्यात जास्त हद्यविकाराच्या आजाराने मृत्यू होत असेलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. हार्ट अटॅक, हार्ट फेल्यूर आणि स्ट्रोकसारखे आजार नकळतपणे उद्भवून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. पण तुम्हाला माहीत आहे.  दैनंदिन जीवन जगत असतान काही सवयींमुळे  तुम्हाला कॅन्सरसारखा जीवघेणा आजार सुद्धा होऊ शकतो. पण जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं  तर मोठी किंमत मोजावी सागू शकते. आज आम्ही तुम्हाला कॅन्सरचा आजार कशामुळे होऊ शकतो. याची कारण सांगणार आहोत.

अतिराग 

Related image

राग येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण तुम्हाला माहीत आहे का अतिराग करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर तुम्ही जास्त रागवून स्वतःला त्रास करून घेत असाल तर  हृद्यासंबंधी आजार होण्याचा धोका वाढत जातो. जास्त राग आल्यानंतर दोन तासांच्या आत तुम्हाला हार्ट अटॅक तसंच हृदयाचे ठोके वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. वयाची ४० वर्ष पार केलेल्या लोकांना हा आजार अधिक होण्याची शक्यता असते. 

दातांचा आजार

Image result for teeth pain

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुमचं हृद्य आणि तोंड यांच्यात  घनिष्ट संबंध आहे.  एका रिसर्चच्या आधारे एक्सपर्ट्स सांगतात. की  हिरड्यांमधून जेव्हा रक्त बाहेर येत असतं त्यावेळी हिरड्यांचे बॅक्टीरीया रक्तात पोहोचून हृदयासंबंधी आजार होण्याचं मोठं कारण असू शकतात. या बॅक्टीरीयामुळे रक्तवाहीन्यांना सुज येत असते. तसंच शरीरात होत असलेल्या रक्तप्रवाहावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. यासाठी तुम्ही ६ महिन्यातून एकदा डेंन्टल चेकअप करणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-२५ ते 3५ या वयोगटातील तरूण होताहेत 'या' गंभीर आजाराचे शिकार, वेळीच व्हा सावध...)

एकटेपणा

Related image

अनेक लोकांना एकटेपणाचा सामना करावा लागत असतो. असे लोक मानसिक ताणाचा सामना करत असतात. एका रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही लोकांसोबत वेळ घालवत असता तेव्हा तणावमुक्त वातावरणात असता. तसंच तुमचे शरीर त्यावेळी एक्टीव्ह असतं. काहीवेळा साठी आलेला एकटेपणा तुमची मानसीक स्थिती बिघ़डवू शकतो. यामुळेच तुम्हाला मानसीक आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

जास्त वेळ काम करणे

Image result for office working(image credit- smart office)

ऑफिसमधील सिनीअर समोर स्वतःचं इम्प्रेशन चागंलं ठेवण्यासाठी जर  तुम्ही जास्त वेळ बसून काम करत असाल तर  वेळीच सावध व्हा. कारण द लॅसेंट यात छापून आलेल्या रिपोर्टनुसार जास्त वेळ ऑफिसमध्ये बसणे, कामाचा जास्त ताण घेणे. मद्याचे जास्त प्रमाणात केलं जाणारे सेवन यांमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर आजारांचा धोका असू शकतो. 

लठ्ठपणा

Image result for overweight

लठ्ठपणाची समस्या सध्याच्या काळात सर्वाधिक दिसून येते. जेव्हा तुमच्या पोटाच्या आजूबाजूला  अतिरीक्त चरबी जमा होते.  तेव्हा हृद्यरोगाचे  सगळ्यात मोठं कारण असू शकतं. त्यामुळे तुम्हाला हृदयविकारासंबंधी  समस्या होण्याचा धोका असतो.  जर तुमच्या पोटावरची चरबी वाढली असेल किंवा वजन वाढलं असेल तर तुम्ही  तात्काळ वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा  डाएट करून वजन नियंत्रणात आणा. अन्यथा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-प्रदुषणामुळे वाढतोय जीवघेण्या टीबी चा धोका, जाणून घ्या बेसिक कफ मॅनेजमेंटचा इफेक्टीव्ह उपाय)

Web Title: Your daily habits may be incressed risk for cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.