वयोवृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त आहे ही समस्या - सर्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 10:54 IST2018-10-03T10:54:12+5:302018-10-03T10:54:53+5:30
नुकत्याच एका सर्वेतून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.

वयोवृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त आहे ही समस्या - सर्वे
(Image Credit : www.independent.co.uk)
अनेकदा लोकांना असं वाटतं की, एकटेपणा सर्वात जास्त हा वयोवृद्धांमध्ये असतो. पण असं नाहीये. नुकत्याच एका सर्वेतून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. हा सर्वे यूनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टर आणि ब्रुनेल यूनिव्हर्सिटी(लंडन) व्दारे केला गेला. या सर्वेनुसार, वयोवृद्धांपेक्षाही आजची फेसबुकवर राहणारी तरुण पिढीला जास्त एकटेपणा जाणवतो.
या सर्वेमध्ये १६ ते २४ वयोगटातील ४० तरुणांनी सांगितले की, त्यांना नेहमीच एकटेपणा जाणवतो. तर ६५ ते ७४ वयाच्या केवळ २९ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनाही एकटेपणा जाणवतो.
यूनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टर आणि ब्रुनेल यूनिव्हर्सिटी लंडन यांच्याकडून हा सर्वे केला गेलाय. या सर्वेमध्ये १६ वयापेक्षा अधिक ५५ हजार लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. त्यांना एकटेपणाच्या अनुभवांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
यातील जास्ती जास्त वयोवृद्ध हे एकटेपणाचे शिकार नाहीत. तर तरुणांमध्ये एकटेपणाची समस्या अधिक आढळली. काही तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, तरुणांना एकटेपणा यासाठी जास्त जाणवतो की, ते स्वत:ला एक्सप्लोर करण्याच्या वयात असतात.
तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, १६ ते २४ वयोगटातील तरुण आपली ओळख शोधण्यात गुंतलेले असतात. याचदरम्यान ते भावनांवर कंट्रोल ठेवणे शिकतात, त्यामुळेच त्यांना एकटेपणा जाणवतो. या सर्वेतून हे समोर आले की, जे लोक स्वत:ला अधिक एकटं फिल करतात ते सोशल मीडियावर अधिक वेळ अॅक्टिव राहणारे असतात.
या व्हर्चुअल जगात त्यांचे अनेक मित्र होते. पण त्यांनी हा सल्ला नाकारला की, त्यांनी डेटिंगची मदत घेतली पाहिजे. त्यांचं म्हणनं होतं की, एकटं असणं आणि एकटेपणा जाणवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ८३ लोकांनी सांगितलं की, त्यांना स्वत:मध्ये गुंतून राहणं पसंत आहे.
सर्वेनुसार, एकटे राहण्याचे पाच गुण असू शकतात. कुणी बोलण्यासाठी नसणं, जगापासून दूर गेल्याचं वाटणं, सर्वांपासून पिच्छा सोडवल्याचं जाणवणं, आपल्याला कुणी समजून घेत नाही असं वाटणं. ४१ लोकांनी सांगितले की, एकटं राहणंही अनेकदा आपल्याला चांगले अनुभव देतात.