पाण्याशिवाय जगणं शक्य हे नाही सर्वांनाच माहीत आहे. पाणी आपली तहान भागवण्यासोबतच शरीराच्या विकासात अनेक महत्वाच्या भूमिकाही बजावतं. पण अलिकडे धावपळीच्या जीवनात, कामाच्या ओझ्यामुळे प्रत्येकाला आरोग्य हेल्दी आणि फिट ठेवणं शक्य होत नाही. अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी आणि फिट राहण्याच्या टीप्स घेऊन आलो आहोत. 

1) ऊर्जा वाढवणं आणि थकवा दूर करणं

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवाणं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते.

2) वजन कमी करण्यात मदत

वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दिवसभर काहीना काही खात रहाणं हे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, त्यासाठी तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी प्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला भूक कमी करण्यास मदत मिळते. 

3) इम्युनिटी सिस्टम होतं मजबूत

(Image Credit : ai-med.io)

तुम्ही जितकं जास्त पाणी पिणार तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहणार. पाण्यामुळे तुमचं इम्युनिटी सिस्टम मजबूत राहतं आणि याने तुम्हाला कॅंसर आणि इतरही रोगांपासून लढण्याची ताकद मिळते. 

4) शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

मिठाचं पाणी पिण्याचे फायदे

1) पचनक्रिया चांगली राहते

मिठाचं पाणी प्यायल्याने तोंडातील लाळ ग्रंथी सक्रीय होतात. त्यामुळे पचनक्रिया संतुलित राहते. 

2) वजन कमी करण्यास मदत

काळं मिठ घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होतात. याने तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने डायबिटीससारखे आजार होण्याची शक्यता कमी असते. 

3) चांगली झोप लागण्यास मदत

मिठ रक्तात कॉर्टिसोल आणि एड्रनिल वाढवण्यासाठी मदत करतं. या दोन्ही गोष्टी हार्मोन्स स्ट्रेससोबत डील करतात. हे हार्मोन्स मॅनेज केल्यास झोप चांगली येते. त्यामुळे जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रोज सकाळी मिठ घातलेलं पाणी सेवन करा.

4) बॅक्टेरियाचा सफाया

मिठाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मिठाचं पाणी अ‍ॅंटी बॅक्टेरिअल सारखं काम करतं. याने तुमच्या शरीरात रोगराई पसरवणारे बॅक्टेरिया मारले जातात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. 

गरम पाणी पिण्याचे फायदे

1) सकाळी लवकर उठून गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलित राहते. जेवण लवकर आणि सहज पचतं.

(Image Credit : lifealth.com)

2) सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचं वजन नियंत्रित राहतं. यामुळे शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.

3) आजकाल वेळेच्याआधीच म्हातारपण येताना बघायला मिळतं. जर तुम्हालाही वयाच्या आधीच म्हातारप नको असेल तर सकाळी उठून रोज गरम पाणी नक्की प्यावे. 

(Image Credit : drweil.com)

4) रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्तसारख्या समस्याही होत नाहीत.

5) गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You Should know the benefits drinking normal water, hot water and salt water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.