Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:55 IST2025-06-27T15:54:44+5:302025-06-27T15:55:20+5:30
Pakistan Swat River Flood: शुक्रवारी ही घटना घडली आहे. स्वात नदीच्या पाण्यात एकाच घरातील १८ जण बुडाले आहेत. यापैकी चार जणांचे मृतदेह सापडले असल्याचे रेस्क्यू दलाचे महासंचालक शाह फहद यांनी सांगितले आहे.

Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
पाकिस्तानात मोठी दुर्घटना घ़डली आहे. स्वात नदीला अचानक पूर आल्याने खैबर पख्तूनख्वाभागात पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले आहेत.
शुक्रवारी ही घटना घडली आहे. स्वात नदीच्या पाण्यात एकाच घरातील १८ जण बुडाले आहेत. यापैकी चार जणांचे मृतदेह सापडले असल्याचे रेस्क्यू दलाचे महासंचालक शाह फहद यांनी सांगितले आहे.
नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आतमध्ये गेलेल्या या कुटुंबाला चोहोबाजुने पाण्याने वेढले होते. पाणी वाढत वाढत जाताच एकेक करून ते पाण्यात पडू लागले. शेवटी तीन-चार जण राहिले होते, ते देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने रेस्क्यू टीमने नदीमध्ये पाच ठिकाणी शोध मोहिम सुरु केली आहे.
دنیا ٹوریزم سے اربوں ڈالر سالانہ کماتی ہے
اور دوسری طرف ہم اپنے لوگوں کو مرنے کے لئیے دریاؤں میں لاچار چھوڑ دیتے ہیں۔
ان 18 افراد کی موت دراصل قتل ہے جو ضلع سوات کی انتظامیہ کی نااہلی کے باعث ہوا۔
کچھ دن ہم سوشل میڈیا پر شور ڈالیں گے اور پھر سب بھول جائیں گے
افسوس صد افسوس۔ pic.twitter.com/TuSmJ2EiRy
स्वात नदी खैबर पख्तूनख्वा भागातील बारमाही वाहणारी नदी आहे. परंतू या नदीला एवढे पाणी नसते. यामुळे या नदीच्या पात्रात उघड्या खडकांवर बसण्यासाठी, पाण्यात खेळण्यासाठी पर्यटक येत असतात. यावेळी नदीच्या वरच्या क्षेत्रात पाऊस पडला होता, त्याचे पाणी वाढल्याने आत गेलेले पर्यटक अडकले होते.