वयाच्या हिशोबाने एवढी मिनिटं धावता आलंच पाहिजे, अन्यथा समजून जा, तुमचा फिटनेस ढासळलाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:35 IST2026-03-31T17:34:37+5:302026-03-31T17:35:22+5:30
Fitness: तज्ज्ञांच्या मते आपलं शरीर वयाच्या हिशोबाने ठराविक वेळेपर्यंत धावू शकतं. तर तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नसाल तर समजून जा की तुमच्या शरीराचा स्टॅमिना आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य ढासळले आहे.

वयाच्या हिशोबाने एवढी मिनिटं धावता आलंच पाहिजे, अन्यथा समजून जा, तुमचा फिटनेस ढासळलाय
आजच्या बदलत्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे निरोगी आणि तंदुरुस्त शरीर राखणं हे खूप अवघड झालेलं आहे. बैठं काम, शरीराचा कमी झालेला व्यायाम, खानपानाच्या बदलेल्या सवयी यामुळे सामान्य फिटनेस राखणंही अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे थोडंफार चाललं, धावपळ केली तरी अनेकांना दम लागतो. अनेकांना जिममध्ये जाऊन कसरत केली की आपण फिट होतो असं वाटतं. मात्र खरी तंदुरुस्ती ही जिममधील आपल्या ताकदीवर नाही, तर आपल्या धावण्याच्या क्षमतेवरून ठरते.
तज्ज्ञांच्या मते आपलं शरीर वयाच्या हिशोबाने ठराविक वेळेपर्यंत धावू शकतं. तर तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नसाल तर समजून जा की तुमच्या शरीराचा स्टॅमिना आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य ढासळले आहे.
आयोग्य तज्ज्ञांच्या प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी तंदुरुस्तीचे आकडे वेगवेगळे असतात. अमेरिकन हार्ट असोशिएशन आणि सीडीसीनुसार २०-३० वर्षांची व्यक्ती किमान २५ ते ३० मिनीटे सातत्याने धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे.
३० ते ४० वर्षांच्या व्यक्तीसाठी २० ते २५ मिनिटांचा रनिंग टाईम सामान्य मानला जातो. तर ४० ते ५० वर्षांनंतर १५ ते २० मिनिटे धावणे हे निरोगी कार्डियोचं लक्षण मानंल जातं. तर ५० वर्षांवरील व्यक्तीसाठी वॉक जॉग फॉर्ममध्ये १० ते १५ मिनिटे धावणं पुरेसं मानलं जातं.
मात्र जर तुम्ही या वेळेच्या आधीच थकलात किंवा तुमचा श्वास फुलला तर तुमच्या तंदुरुस्तीचा स्तर ढासळला आहे, असा त्याचा अर्थ होतो. तसेच हा आकडा केवळ अॅथलिट्ससाठीच नाही तर सामान्य व्यक्तींच्या निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे.