शरिरात अनेकदा रक्तप्रवाह सुरळित होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अनियमीत जीवनशैलीमुळे संपूर्ण शरीरात रक्त व्यवस्थित पोहोचत नाही. त्यामुळे डायबिटीस, मधूमेह यांसारख्या जीवघेण्या आजार होऊ शकतात.  कराण जर शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित झाला नाही तर  रक्ताच्या गाठी तयार होणं. हद्यापर्यंत रक्त न पोहोचणं या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच हार्ट अटॅक येतो. पण  तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित झाला तर तुम्हाला या आजरांपासून वाचता येऊ शकतं. 
 

आज आम्ही तुम्हाला शरीरातील रक्तप्रवाह सुरूळित करण्यासाठी फायदेशीर ठरत असेलेल्या योगासनांबद्दल सांगणार आहोत. ही योगासन करायला तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. घरच्याघरी फक्त २० ते ३० मिनिटं   तुम्ही हा व्यायाम केला तर फरक दिसून येईल.   बारिक होण्यासोबतच तुम्ही आजारांपासून सुद्धा दूर रहाल. कारण एखादा आठवडा प्रकृती चांगली राहिल्यानंतर पुन्हा आरोग्यासंबंधीत कुरबुरी उद्भवत असतात. म्हणून फिट राहण्यासाठी नक्की ही योगासनं करा.

ताडासन

 उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही ही समस्या कमी करू शकता.  फुप्पुसांची क्षमता सुधारण्यासाठी ताडासन फायदेशीर ठरत असतं.  प्रेग्नंसीच्या आधी तीन महिने जर तुम्ही ताडासन केलं तर क्षमता सुधारण्यास मदत होईल.ब्रीदिंग टेक्निकने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊ शकतं. ( हे पण वाचा- घरच्या घरी 'या' एक्सरसाइज करा झटपट, गुडघेदुखीची समस्या दूर होईल पटापट!)

त्रिकोणासन 

त्रिकोणासन केल्याने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहण्यासोबतच ऑस्टियोपोरोसिसची समस्या सुद्धा कमी होईल.  गरोदरपणात सुद्धा तुम्ही त्रिकोणासन  करू शकता. हे आसन सुरू करण्या पूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. (हे पण वाचा-३ मुलं होऊनही इवांकाने कसं ठेवलयं स्वतःला फिट, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं सिक्रेट.....)

Web Title: Yogasan for preventing heart attack by maintaining blood circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.