वाढत्या वयासोबत या ५ कारणानी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 17:31 IST2022-08-20T17:30:58+5:302022-08-20T17:31:33+5:30

Wrinkles Face Reason : आहारातील पोषत तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत. 

Wrinkles before time: 5 reasons you have wrinkles | वाढत्या वयासोबत या ५ कारणानी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, वेळीच व्हा सावध!

वाढत्या वयासोबत या ५ कारणानी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, वेळीच व्हा सावध!

Wrinkles Face Reason :  चेहऱ्यावर सुरकुत्या येणे हे वृद्ध होत असल्याचे संकेत आहेत. पण सुरकुत्या येण्याची याव्यतिरिक्तही आणखी काही कारणे असतात. तशी तर वाढत्या वयासोबत चेहऱ्याचा तजेलदारपणा कमी होत जातो आणि सुरकुत्या येऊ लागतात, पण नेहमी असं होत नाही. अनेकदा कमी वयातही सुरकुत्या येण्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो. याला आहारातील पोषत तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाईल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत. 

झोपण्याची चुकीची पद्धत

अनेकदा दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही थकलेले घरी येता तेव्हा पोटावर भार देऊन बेडवर पडता. असं झोपल्याने चेहरा उशीवर दाबला जातो. त्यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. 

त्वचा हायड्रेशन

पाण्याच्या कमतरतेमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे पाणी पिण्यावर भर द्यावा जेणेकरून गरमीच्या दिवसात चेहऱ्यावर कोरडेपणा येऊ नये. सोबतच जर त्वचा रखरखीत असेल तर आंघोळीआधी तेलाने मसाज करावी. 

साबण

साबणामुळे नेहमीच त्वचेचा ओलावा शोषला जातो आणि त्वचा कोरडी व निर्जिव दिसते. ज्यामुळे वेळेआधीच तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. 

सतत चेहरा धुणे

अनेकदा सतत त्वचा पाण्याच्या संपर्कात येत असल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. कारण चेहऱ्याची त्वचा अधिक संवेदनशिल असते. 

डार्क चॉकलेट 

जर तुम्हाला त्वचेवर सुरकुत्यांची समस्या असेल तर डार्क चॉकलेट खाण्यास सुरूवात करा. याने तुम्हाला फायदा होईल.  

Web Title: Wrinkles before time: 5 reasons you have wrinkles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.