शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

​दारू पिण्यात झपाट्याने वाढतोय महिलांचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 14:15 IST

एका जागतिक अभ्यासानुसार नवपीढीतील तरुण महिलांमध्ये दारूचे व्यसन झपाट्याने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दारूचे व्यसन प्रामुख्याने पुरुषांमध्ये जास्त असते हा समज आगामी काळात खोटा ठरू शकतो अशी परिस्थिती आहे. सर्व क्षेत्रांप्रमाण दारू पिण्यातही महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देताना दिसत आहेत. एका जागतिक अभ्यासानुसार नवपीढीतील तरुण महिलांमध्ये दारूचे व्यसन झपाट्याने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.१८९१ - २००१ यादरम्यान जन्मलेल्या सुमारे ४० लाख लोकांच्या विश्लेषणाअंती पुरुषांमध्ये दारूचे व्यसन महिलांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात होते. परंतु ‘बीएमजी ओपन’च्या रिपोर्टनुसार सध्याच्या पीढीमध्ये हा फरक झपाट्याने कमी होतोय.वीसाव्या शतकात पुरुषांची महिलांशी तुलना केली असता पुरुषांमध्ये -► दारूचे व्यसन २.२ पट अधिक  ► धोक्याच्या पातळीपर्यंत दारू पिण्याचे प्रमाण ३ पट जास्त► दारूमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता ३.६ पट अधिक होती.हेच प्रमाण आता मात्र या दशकात झपाट्याने खाली येत आहे. म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटी शेवटी जन्मलेल्या पुरुषांची महिलांशी तुलना केली असता पुरुषांमध्ये -► दारूचे व्यसन फक्त १.१ पट अधिक,► धोक्याच्या पातळीपर्यंत दारू पिण्याचे प्रमाण १.२ पट जास्त,► दारूमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता नाममात्र १.३ पट अधिक राहिली आहे.आॅस्ट्रेलियातील न्यु साऊथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी जगभरातून जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढला की, महिलांमध्ये दारूचे व्यसन व त्यासंबंधीत आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ पुरुषांपुरती ही समस्या आता मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि खासकरून तरुण महिलांमध्ये दारूच्या दुष्परिणामांविषयी जागृती करणे गरजेचे आहे.‘लंडन स्कुल आॅफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’चे प्रा. मार्क पॅटिक्रू सांगतात की, बदलत्या काळानुसार पुरुष व महिलांचे समाजातील बदलते स्वरुप व स्थान काही अंशी यासाठी कारणीभूत आहे. तसेच दारूची असलेली सहज उपलब्धता हेसुद्धा महिलांमध्ये व्यसन वाढण्याचे कारण असू शकते.