शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
2
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
3
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
4
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
5
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
6
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
7
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
8
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
9
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
10
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
11
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
12
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
13
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
14
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
15
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
16
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
17
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
18
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
19
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
20
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सात टक्के हृदय कार्यरत रुग्णावर वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 5, 2014 20:56 IST

नाशिक : केवळ सात टक्के हृदय कार्यरत असणार्‍या ४१ वर्षीय रुग्णावर जोखीम पत्करत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ उत्तर महाराष्ट्रातील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा वोक्हार्टचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ राहुल कैचे व केंद्रप्रमुख डॉ़ अविनाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला़

नाशिक : केवळ सात टक्के हृदय कार्यरत असणार्‍या ४१ वर्षीय रुग्णावर जोखीम पत्करत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ उत्तर महाराष्ट्रातील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा वोक्हार्टचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ राहुल कैचे व केंद्रप्रमुख डॉ़ अविनाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला़
डॉ़ कैचे म्हणाले, सरासरी १५ टक्केच्या खाली हृदय कार्यरत असणार्‍या रुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया करणे हे जोखीम पत्करण्यासारखे असते़ यामध्ये रुग्णाचे हृदय बंद पडणे, ठोके अनियमित होणे, किडनी फे ल होणे, मधुमेह असेल तर पक्षघात व संक्रमण असे अनेक धोके असतात़ यामुळे अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे इतर डॉक्टर टाळतात़ परंतु हे आव्हान स्वीकारत आपण ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली़ आत्मविश्वास व वोक्हार्टच्या अतिशय प्रशिक्षित सहकारी वर्गामुळे हे शक्य झाले, असेही ते म्हणाले.
ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली ते कल्याणचे जयेश छाया हे व्यावसायिक आहेत़ त्यांच्यावर ॲसिडिटी व पाठीचे दुखणे यावर महिनाभर मुंबईत उपचार सुरू होते; परंतु काहीच आराम पडत नव्हता. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी नाशिक येथील एका नर्सिंग होममध्ये त्यांना आणले होते़ तेथे काही चाचण्या केल्यानंतर त्यांना हृदयरोगाचा झटका येऊन गेल्याचे निदान झाले़ त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता सात टक्क्यांपेक्षाही कमी होती. अशा अवस्थेत वोक्हार्टमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे वय पाहता जोखीम पत्करत व शुद्ध रक्तवाहिन्यांचा वापर करत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली़ सात दिवसांत सदर रुग्णास मुक्त करण्यात आले असून, प्रकृती एकदम ठीक असल्याचे शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण जयेश छाया यांनी सांगितले़