गोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता? असं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:15 IST2018-10-22T17:15:36+5:302018-10-22T17:15:55+5:30
जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते.

गोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता? असं पडू शकतं महागात!
(Image Credit : TheHealthSite.com)
जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते. काही गोड खाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अचानक तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. पाणी हे ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचं काम करतं. गोड खाल्यावर पाणी न प्यायल्यास शुगर लेव्हल नियंत्रित राहते.
साऊथ अमेरिकेतील सूरीनाममध्ये झालेल्या या रिसर्चमध्ये धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. या रिसर्चमध्ये दोन गटात प्रयोग करण्यात आला. एका ग्रुपला गोड खाल्यावर पाणी दिले नाही आणि दुसऱ्या ग्रुपला लगेच पाणी देण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, गोड खाल्यावर ज्यांनी पाणी पिले त्यांच्या ब्लड शुगरमध्ये वेगाने वाढ झाली.
अभ्यासकांचं म्हणनं आहे की, नेहमीच गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय असेल तर त्या व्यक्तींना टाईप-२ डायबिटीजचा धोका वेगाने वाढू शकतो. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, पाण्यासोबत ग्लुकोज वेगाने शरीरात शोषूण घेतलं जातं. तेच जर गोड काही खाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्यास हा धोका टळू शकतो.
काय कराल?
- जर काही गोड खाल्लं तर त्यावर लगेच काही चटपटीत पदार्थ खावा, याने पाणी पिण्याची इच्छा शमली जाईल.
- गोड पदार्थ खाल्यावर गुरळा नक्की करा.
- जेव्हाही गोड काही खाण्याची इच्छा झाली तर त्याऐवजी फळे खावे.
- चॉकलेट किंवा टॉफीसोबत पाणी पिण्याऐवजी फळे खाऊ शकता.
- मिल्क शेक किंवा कोल्ड कॉफीऐवजी ज्यूस प्यावा.
जर गोड खाल्यावर पाणी पिण्याची इच्छा झाली तर पाणी तोंडात घेऊन लगेच बाहेर काढा. याने पाणी पिण्याची इच्छा कमी होईल. रिसर्चमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्यांच्या घरात कुणाला डायबिटीज असेल त्या घरात गोड खाणे टाळावे.