केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:26 AM2019-12-23T10:26:34+5:302019-12-23T10:32:23+5:30

अनेकांना हा प्रश्न पडतो की, हिवाळ्यात वजन जास्त का वाढतं? तर याचं एक मुख्य कारण समोर आलं आहे.

Why we gain more weight in winter? | केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे...

केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे...

Next

(Image Credit : besthealthmag.ca)

वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे नेहमीच रिसर्चच्या माध्यमातून समोर येत असतात. आता एका नव्या रिसर्चनुसार, कॅलरीज स्टोर करण्याची शरीराची सवय थंडीच्या दिवसात अधिक वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसात वाढत्या वजनावर कंट्रोल  ठेवणं अवघड जातं. 

आतापर्यंत असं मानलं जात होतं की, हाय कॅलरी फूड आणि एक्सरसाइज न केल्याने आपलं वजन वाढतं. पण रिसर्चमधून समोर आलं आहे की, केवळ ही दोनच कारणे हिवाळ्यात वजन वाढण्याला कारणीभूत नाहीत तर  हिवाळ्यात शरीराला कॅलरी स्टोर करून ठेवण्याची सवय असते, त्यामुळेच या दिवसात काही किलो वजन वाढतं.

इतरही काही कारणे

(Image Credit : huffingtonpost.com.au)

हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक हे हायबरनेशन मोडमध्ये जातात. ज्यामुळे आपण आपल्या आरामदायी बिछान्यात शरीर गरम करण्याचा प्रयत्न करतो आणि लेझी आवर्सचा काळ वाढतो. वैज्ञानिकांना आढळलं की, अस्वलांप्रमाणे मनुष्य सुद्धा हिवाळ्यात स्वत:ला हायबरनेट करतात आणि दररोज साधारण २०० कॅलरी अधिक घेतात.

स्लीप हार्मोन वाढतात

रिसर्चमधून समोर आले आहे की, सनलाइट आणि उन्ह कमी असल्याकारणाने आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. शरीरातील पीनल ग्लॅंड अधिक प्रमाणात मेलाटोनिन रिलीज करू लागतं. हे एक स्लीप हार्मोन आहे. यामुळे सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर वाढू लागतं आणि आपल्याला हिवाळ्यात जास्त झोप येते. याकारणाने आपली शारीरिक हालचाल कमी होते आणि आहार जास्त घेतला जातो. 

मेटाबॉलिज्म 

हिवाळ्यात आपल्या शरीराला गरमी देण्यासाठी आपलं मेटाबॉलिज्म अधिक एनर्जी बर्न करू लागतं. एक्सपर्ट्स सांगतात की, या एक्स्ट्रा एनर्जीसाठी शरीराला जास्त आहाराची गरज असते. पण असं अजिबात नाहीये की, जास्त खाऊन आपण शरीराला गरमी देऊ शकतो. जर आपण गरम वातावरणात राहिलो तर आपल्या शरीराला कमी भूक लागेल आणि वजन नियंत्रणात राहणार.

गरम पदार्थ खाण्याची इच्छा

(Image Credit : thelist.com)

हिवाळ्यात आपल्याला जास्त गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. जसे की, नट्स, तीळ, गूळ, स्वीट, पास्ता, क्रीमी सॉस इत्यादी. जास्तीत जास्त वेळ आपल्याला भूक नसतानाही काहीतरी गरम, गोड किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होते. यालाच क्रेव्हिंग म्हणतात. यानेही वजन वाढतं.


Web Title: Why we gain more weight in winter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.