वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 11:41 IST2019-06-26T11:40:59+5:302019-06-26T11:41:38+5:30
सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet).

वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?
सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet). तुम्हालाही वजन कमी करायंच असेल आणि त्वचेवर ग्लो हवा असेल तुम्हीही वेगन डाएटचा विचार करू शकता. पण ही डाएट तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि योग्य पद्धतीने केली तरच याचा अधिक फायदा होतो.
द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या वेगन डाएटला सर्वात चांगलं मानलं जात आहे. आहारतज्ज्ञ देखील याचे वेगवेगळे फायदे सांगत असतात. वेगन डाएटमध्ये प्लांट बेस्ड फूडचा समावेश केला जातो. यात प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याही पदार्थांचा समावेश नसतो, इतकेच नाही तर यात डेअरी प्रॉडक्टचा देखील समावेश नसतो. त्यामुळे ही डाएट फिटनेससाठी फार फायदेशीर मानली जाते. चला जाणून घेऊया याचे फायदे.
काय आहे वेगन डाएट?
वेगन डाएट (Vegan Diet) गेल्या काही दिवसांपासून सर्वात जास्त ट्रेन्ड होत आहे. मोठमोठे सेलिब्रिटी देखील ही डाएट फॉलो करतात. या डाएटमध्ये केवळ प्लांट बेस्ड पदार्थांचा समावेश केला जातो. या डाएटमुळे तुमचा वेगवेगळ्या संक्रमणांपासूनही बचाव होतो. तसेच याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याने वजन कमी होतं आणि नियंत्रणात राहतं. यात झाडांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. त्यात कडधान्य, डाळी, फळं, भाज्या, सलाद इत्यादींचा समावेश असतो.
काय होतात फायदे?
वजन कमी होतं
वेगन डाएट वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगली डाएट मानली जाते. यात कॅलरी आणि फॅट कमी प्रमाणात असतं. याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. तसेच याने तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा फॅटही कमी होण्यास मदत मिळते. तज्ज्ञ मानतात की, वेगन डाएटच्या सेवनाने मेटाबॉलिज्म रेटही वाढतो.
वाढते एनर्जी
वेगन डाएटमध्ये प्रोटीन आणि आयर्न भरपूर असतं. त्यामुळे तुमच्या शरीराला तेवढीच जास्त एनर्जी मिळण्यास मदत होते. सोबतच शरीराला मजबूती आणि ताकद मिळते. ज्यामुळे तुम्हाला कधीही थकवा जाणवत नाही.
पचनक्रिया होते मजबूत
वेगन डाएटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्याने तुमची पचनक्रिया मजबूत आणि चांगली होते. याने तुम्ही खाल्लेलं सगळं पचण्यास मदत मिळते.
येते चांगली झोप
वेगन डाएट फॉलो केल्याने झोप न येण्याची समस्या होत नाही. केळी, बदाम, रताळे यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी ६ आणि ट्रिप्टोफिन असतं. याने तुमची झोप चांगली होते.
अॅंटी-ऑक्सिडेंट डाएट
वेगन डाएटमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. याने शरीरातील विषारी पदार्थ नष्ट होतात आणि सोबतच बॉडी डीटॉक्सही होते. ज्यामुळे तुम्ही अधिक हेल्दी आणि फिट राहता.
(टिप : वरील सल्ले हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा ही डाएट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.)