(Image Credit : healthline.com)
अनेक लोकांसोबत असं होतं की, त्यांचं वय वाढल्यावर अचानक त्यांना त्यांचं आवडतं काम करायची भिती वाटते. तशी तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कशाची ना कशाची भिती असते आणि हे नैसर्गिक आहे. याबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये. पण असं जर वाढलेल्या वयात अचानक होत असेल तर याची वेगवेगळी कारणे असू शकतात. आपल्या अनुभवांच्या आधारावर तज्ज्ञांनी याबाबत आश्चर्यकारक गोष्ट सांगितल्या आहेत.
मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक शास्त्रज्ञ सांगतात की, जर कोणतीही वयस्क व्यक्ती अचानकपणे त्यांना आवडणारी, पसंतीची कामे करायला घाबरत असेल तर यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. आधी यावर लक्ष द्या की, कोणत्या गोष्टींमुळे लोकांना अचानक भिती निर्माण होते? यात विमान प्रवास, राफ्टिंग, क्लाइंबिंग, उंचीवरून खाली बघितल्यावर किंवा काही केसेसमध्ये कुकिंग केल्यावरही लोकांना भिती लागू शकते.
कोणत्या कारणांनी भिती निर्माण होते
1) तज्ज्ञ सांगतात की, वय वाढल्यावर निर्माण होणारी भिती सामान्यपणे घातक रूप घेते. ही समस्या दूर करण्यासाठी याच्या मुख्य कारणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा अशाप्रकारच्या रूग्णांशी आम्ही डील करतो, तेव्हा जास्तीत जास्त केसेस चिंता आणि तणावाच्या समोर येतात. या दोन्ही स्थितींसाठी रूग्णांची वेगवेगळी कारणे असू शकतात.
2) डेब्रा होप हे नेब्रास्का-लिंकन विश्वविद्यालयात सायकॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, सामान्यपणे लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची भिती लो असते किंवा मॅनेजेबल असते. म्हणजे लोक त्यांची भिती मॅनेज करतात. पण वाढलेल्या वयात घातक भिती निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. होप सांगता की, अशा भितीच्या काही सामान्य कारणांमध्ये परिवाराची चिंता, पहिल्यांदा पॅरेंट होणं, फार जास्त जबाबदाऱ्या असणे आणि सतत त्याच चिंतेत राहणे यांचा समावेश होतो.
3) होप यांच्यानुसार, काही लोकांमध्ये वय वाढल्यावर ड्रायव्हिंगबाबत फोबिया म्हणजे भिती निर्माण होते. याचं मोठं कारण चिंता असतं. अनेकदा आपल्या लाइफ पार्टनरचं निधन किंवा घटस्फोटनंतर लोक य मेंटल फेजमधून जातात. जेव्हा त्यांना कार ड्रायव्हिंग किंवा सोशल गॅदरिंगने भिती वाटू लागते. अशा जास्तीत जास्त रूग्णांना असं वाटतं की, ते अशाप्रकारे आपल्या पार्टनरसोबत जात होते. आता तसं करणं त्यांना एकटेपणा आणि मृत्यूची भिती सतावते.