(Image credit-first cry parenting)
गरोदर स्त्रियांना नेहमीच वेगवेगळे पदार्थ खावसं वाटत असतं. पण खासकरून या काळात आंबट खायला महिलांना आवडतं. अनेक हार्मोनल बदल या काळात होत असतात. तसेच खाण्यापिण्याच्या आवडी बदलत असतात. तर मग जाणून घ्या. गरोदर महिलांना आंबट खावसं का वाटतं.
गरोदर असताना अनेक स्रियांना आबंट खावस वाटते. यामागचे कारण असे की, या काळात खूप हार्मोनल बदल स्रियांमध्ये होत असतात. त्यामुळे स्त्रिया कैरीच्या किंवा चिंचाच्या वासाने आकर्षित होतात. त्यांचे हार्मोन्स जास्त सक्रीय होतात. आणि त्यामुळे बायकांना वेळीअवेळी एखादी ठराविक गोष्ट खाण्याची इच्छा होते. यालाच एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे डोहाळे लागणे असे म्हणतात. एखादा पदार्थ खायला मिळाला नाही, तर अस्वस्थ व्हायला होतं. आणि हवं ते खायला मिळालं की, मनाचं लगेच समाधान होतं. हे डोहाळे म्हणजे बाळालाच तो पदार्थ खायची इच्छा होते आहे असं मानलं जातं, त्यामुळे हे डोहाळे अगदी हट्टाने पुरविले जातात.
माती, खडू यांसारखे पदार्थ खावेसे वाटणे हे त्या स्त्रीला रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया झाला असल्याचं लक्षण समजलं जातं. काही गरोदर बायकांना कोळसा खाण्याचे डोहाळे लागतात. सुमारे २५ ते ३० टक्के गर्भवती महिलांमध्ये कोळसा खाण्याची इच्छा उत्पन्न होते.
काही गरोदर बायकांना कच्च्या कांद्याचा वास देखील सहन होत नाही. तर अनेक बायकांना कच्चा कांदा खावासा वाटतो. कच्चा कांदा खाण्यात कोणतेही नुकसान नसले तरी तो प्रमाणातच खाल्ला जावा. अनेक बायकांना बर्फ खाण्याची इच्छा होते. गरोदर महीलांना लोणंच सु्ध्दा खावस वाटत. कारण त्यात मसाल्याचे पदार्थ असतात. त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत, याचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.