Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 20:30 IST2021-10-18T20:30:05+5:302021-10-18T20:30:59+5:30
Coronavirus Live Updates, Covaxin: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. तसंच तिसऱ्या लाटेचीही शक्यता कमी असल्यां तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती
Coronavirus Live Updates, Covaxin: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. तसंच तिसऱ्या लाटेचीही शक्यता कमी असल्यां तज्ज्ञांनी म्हटलं आहे. देशात कोरोना विरोधी लसीकरण मोहीम देखील मोठ्या वेगात सुरू आहे. पण कोरोनावर प्रभावी ठरलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन (Covaxin)लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना परदेशवारी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी आता भारत बायोटेककडे कोव्हॅक्सीनबाबत आणखी माहिती सादर करण्याची मागणी केली आहे. डब्ल्यूएचओच्या अॅडवायझरी कमिटीची २६ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत कोव्हॅक्सीनच्या मंजुरीबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
भारतात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची Covishield, भारत बायोटेकची Covaxin, रशियाची स्फुटनिक तसेच एक डोस पुरेशी असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. भारताखेरीज अन्य देशांमध्ये कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, WHO कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढील बैठकीकडे भारताचे लक्ष लागले आहे.