वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान किंवा डाएट चार्ट तयार करताना काही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्वही पुरवणं महत्त्वाचं असतं. अशातच डाळी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. डाळींमध्येही वेगवेगळे प्रकार आढळून येतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. 

अनेक लोकांना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी डाएट प्लानमध्ये नक्की कोणत्या डाळींचा समावेश करणं फायदेशीर ठरतं? द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, वजन कमी करण्यासाठी डाएट प्लानमध्ये अशा डाळींचा समावेश करावा ज्यांमध्ये प्रोटीनचम प्रमाण जास्त असेल आणि पचण्यासही हलकी असेल. 

खरं तर पचण्यास हलके असणारे पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर डाळींचं महत्त्व आणखी वाढतं. आज आम्ही तुम्हाला काही अशाच डाळींबाबत सांगणार आहोत. ज्या आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतील. 

मूगाची डाळ 

वजन कमी करण्यासाठी मूगाच्या डाळीचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं. हिरव्या मूगाची डाळी वजन कमी करण्यासाठी डाएट प्लानमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. हिरव्या मूगाच्या डाळीमध्ये फायबर, प्रोटीनसोबतच इतरही व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. मूगाची डाळपचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. तसचे या डाळीच्या सेवनाने शरीराचा मेटाबलिक रेट वाढण्यासही मदत होते. 

तूरीची डाळ 

जगभरामध्ये सर्वात लोकप्रिय असलेली तूरीची डाळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तूरीची डाळ चवीला उत्तम असण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी मदत करते. सर्व डाळींच्या तुलनेमध्ये तूरीच्या डाळीमध्ये जास्त प्रोटीन असतं. शाकाहारी वेट लॉस डाएटमध्ये तूरीच्या डाळीचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. 

चण्याची डाळ 

झटपट वजन कमी करण्यासाठी चण्याच्या डाळीचं सेवनही अत्यंत फायदेशीर ठरतं. चण्याच्या डाळीमध्ये पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म आढळून येतात. चण्याची डाळी आतड्यांसाठीही फायदेशीर ठरते. ज्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि वजन कमी होतं. 

मसूर डाळ 

तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मसूर डाळीचा आहारात नक्की समावेश करा. मसूर डाळीच्या सेवनाने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच शरीर डिटॉक्स करण्यासाठी मसूर डाळ अत्यंत फायदेशीर ठरते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Which pulses or daal are best for weight loss diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.