थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:06 AM2018-10-30T11:06:18+5:302018-10-30T11:06:23+5:30

थंडीच्या दिवसात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक वजन वाढतं. जे लोक या दिवसात आपल्या डाएटवर लक्ष देत नाहीत त्यांचं वजन लगेच वाढू शकतं.

What is the reason of gaining weight in cold season ? How to prevent | थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

Next

थंडीच्या दिवसात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक वजन वाढतं. जे लोक या दिवसात आपल्या डाएटवर लक्ष देत नाहीत त्यांचं वजन लगेच वाढू शकतं. वातावरण जसजसं अधिक थंड होत जातं लोक एक्सरसाइज कमी करतात आणि त्यामुळे कॅलरी कमी बर्न होतात. त्यामुळे वजन आणखी वाढत जातं. आज आम्ही तुम्हाला थंडीत वजन वाढण्याची कारणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत.  

थंडीत का वाढतं वजन?

आपल्या शरीरातील रक्त पोषण आणि गरमी देण्याचं काम करतं. जेव्हा आपण काही खातो, त्यातून आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऊर्जा मिळते आणि याने आपल्याला गरमी जाणवायला लागते. पण जेव्हा आपण काही खात नाही, तेव्हा मेंदूपर्यंत हा संदेश पोहोचतो की, आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पोषकयुक्त रक्त नाहीये. त्यामुळे अशात आपल्याला पुन्हा खाण्याची इच्छा होते. याने वजन वाढण्याची शक्यता असते. 

काय खावे?

डाळिंब

हिरव्या भाज्या

सिट्रस फळं

बटाटे

काय घ्यावी काळजी?

आठवड्यातून खूपदा गोड पदार्थ खाऊ नका

ब्रेकफास्टमध्ये ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करा

रात्रीच्या जेवणाआधी टोमॅटो किंवा भाज्यांचा ज्यूस प्यावा

सकाळी व्यायाम करण्याऐवजी सायंकाळी व्यायाम करा

आपल्या नियमीत व्यायामाच्या रुटीनवर कायम रहा

रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्यांचा समावेश करा

क्रिम असलेलं दूध घेण्याऐवजी फॅट असलेलं दूध प्यावं

दिवसातून दोन ते तीनदा ग्रीन टी घ्या

चहा-कॉफीवर कंट्रोल करा

थंडीच्या दिवसात नेहमीच चहा आणि कॉफीचं अधिक सेवन केलं जातं. थंडीत भलेही चहा आणि कॉफी तुम्हाला आरामदायक वाटत असतील तरी याती निकोटीन आणि कॅफीन तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याने भरपूर प्रमाणात कॅलरी वाढतात. तसेच साखरेचं अधिक प्रमाण झाल्यास वजन वाढतं. याऐवजी लेमन टी किंवा मिंट ची सेवन करा.

पाणी गरजेचं

थंडीच्या दिवसात तहान कमी लागते. त्यामुळे अनेकजण पाणी कमी पितात. पण आपली पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. पाणी थंड वाटत असेल तर ग्रीन टी, हर्बल टी किंवा ब्लॅक टी चा पर्याय निवडू शकता. 

Web Title: What is the reason of gaining weight in cold season ? How to prevent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.