शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बसून बसून वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं जास्त फायदेशीर की भाज्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 10:03 IST

फळं आणि भाज्यांचे आपापले वेगळे फायदे आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, वजन कमी करण्यासाठी फळं अधिक खावीत की भाज्या? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....

(Image Credit : womenshealthmag.com)

सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळ आणि भाज्यांना बॅलन्स डाएट मानलं जातं. त्यामुळे लोक त्यांच्या आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करतात. पण यातून एकाची निवड करणं फार कठिण असतं.फळं आणि भाज्यांमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि कॅलरी समान असतात. त्यासोबत फळं आणि भाज्यांचे आपापले वेगळे फायदे आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, वजन कमी करण्यासाठी फळं अधिक खावीत की भाज्या? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....

नुकत्याच करण्यात आलेल्या पीएलओएस मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मोड आलेलं कडधान्य, ब्रोकली अशा नॉन स्टार्ची भाज्यांचं सेवन करणं फायदेशीर असतं. पण बेरीज, सफरचंद आणि पेर सारखी फळं खाणंही चांगलं मानलं जातं. जर वजन कमी करण्याचा प्रश्न असेल फळं अधिक फायदेशीर आहेत.

रिसर्चमध्ये आढळून आले की, स्मूदी वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असते. यात अनेक प्रकारची फळं आणि अधिक प्रमाणात फायबर असतं. त्यासोबतच रोज सफरचंद आणि पेराचं सेवन केल्याने जास्तीत जास्त वजन कमी होतं. जर तुम्ही भाज्यांचे शौकीन असाल तर वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये सोया, टोफू, फ्लॉवर आणि पालकाचा समावेश करा.

रिसर्चमधून समोर आले की, वजन कमी करण्यासाठी भाज्यांच्या तुलनेत फळं अधिक फायदेशीर आहेत. फळं सहजपणे पचतात आणि यांचा डाएटमध्ये कधीही समावेश करावा. यात हेल्दी कॅलरी आणि अधिक प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट आढळतात. फळं खाल्ल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर पोट भरलं राहिल्याने इतर काही खाण्याची इच्छा होत नाही.

यूनिव्हर्सिटी ऑफ लंडननुसार, डबाबंद फूडचं सेवन केल्याने गंभीर आजार होऊ शकतात. रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, आरोग्यासंबंधी समस्यांपासून वाचण्यासाठी फळांच्या तुलनेत भाज्यांचं सेवन करणं अधिक फायदेशीर असतं. पण याचा अर्थ असा नाही की, फळं आरोग्यासाठी हानिकारक आहेत. रिसर्चमधून निष्कर्ष काढण्यात आला की, वजन कमी करण्यासाठी भाज्यांच्या तुलनेत फळं कमी फायदेशीर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये भाज्या आणि फळं दोन्हींचा समावेश करा.

हे पण वाचा :

तुम्हालाही 'या' २ समस्या असतील; तर रात्री चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचं सेवन

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्य