'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 02:38 PM2020-08-12T14:38:39+5:302020-08-12T14:52:51+5:30

जे लोक धुम्रपान करत नाहीत त्यांनाही आजार होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांच्या कॅन्सर हा तुम्ही किती प्रमाणात धुम्रपान करत आहात यावर अवलंबून असतो. 

lung cancer 6 big reasons for disease know symptoms causes and prevention | 'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

googlenewsNext

बॉलीवुड अभिनेता संजय दत्त फुफ्फसांच्या कॅन्सरशी लढत आहे. संजय दत्तला थर्ड स्टेजचा एडवांस कॅन्सर झाला आहे. रिपोर्ट्सनुसार या आजाराच्या उपचारांसाठी संजय दत्त परदेशात जाण्याची शक्यता आहे. फुफ्फुसांचा कॅन्सर हा जीवघेणा आजार असून  दरवर्षी या आजारामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. आज आम्ही तुम्हाला या आजाराची लक्षणं आणि बचावाचे उपया सांगणार आहोत. 

माणसाच्या छातीत दोन स्पॉन्जी अवयव म्हणजेच फुफ्फुस असतात. शरीरात ऑक्सिजन घेण्याचं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्यासाचं काम फुफ्फुसांद्वारे केलं जातं. mayoclinic च्या एका रिपोर्टनुसार  धुम्रपान केल्यानं फुफ्फसांमध्ये कॅन्सरचा धोका जास्त वाढतो. जे लोक धुम्रपान करत नाहीत त्यांनाही आजार होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांच्या कॅन्सर हा तुम्ही किती प्रमाणात धुम्रपान करत आहात यावर अवलंबून असतो. 

फुफ्फुसांच्या कॅन्सरची कारणं

तंबाखू, सिगारेट अशा मादक पदार्थांचे रोज जास्त प्रमाणात सेवन केल्यानं  आजार पसरण्याचा धोका वाढतो. गाड्यांमधून, फॅक्ट्रीजमधून बाहेर येत असलेल्या धुरात बेंजीन गॅस असतो. या धुरामुळे हवा प्रदुषित होते. त्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अनुवांशिकतेमुळे हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात असलेल्या जीन्समधील बदलांमुळे हा जीवघेणा आजार उद्भवतो.

फुफ्फुसांच्या कॅन्सरचे दोन प्रकार आहेत. पहिला स्मॉल सेल लंग्स कॅन्सर आणि दुसरा नॉन स्मॉल सेल लंग्स कॅन्सर. यातील स्मॉल सेल लंग्स कॅन्सर हा खूप गंभीर असतो. कारण या आजारात कॅन्सरच्या सेल्सची वाढ झपाट्यानं होते. जबकि नॉन स्मॉल सेल लंग्स कॅन्सर तुलनेनं कमी वेगाने पसरतो. पण दोन्ही प्रकारचे आजार जीवघेणे ठरू शकतात.

इन 6 कारणों से किसी को भी हो सकता है फेफड़ों का कैंसर, जानें लक्षण और बचाव

फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं

तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळी खोकला येणं, लवकर आराम न मिळणं.

छातीत वेदना

चालताना शिड्या चढताना उतरताना दम लागणं

खोकल्यातून रक्त बाहेर येणं

वजन वेगानं कमी होणं.

अनेकदा फुफ्फुसांचा कॅन्सर सुरूवातीच्या लक्षणांनंतर कळून येत नाही.  आजार एडवांस  स्टेजमध्ये पोहोचल्यानंतर आजाराबात वैद्यकिय तपासणीतून माहिती मिळते. फुफ्फुसांशी जोडलेल्या समस्या समोर आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उपचार त्वरित केलं जाऊ शकतात. कॅन्सरमध्ये व्यक्तीची फुप्फुसं वेगाने खराब होऊ लागतात. यात श्वास घेण्यास अडचण होणे, सतत कफची समस्या होणे, हाडे आणि जॉइंट्समध्ये वेदना होणे अशा समस्या होतात. जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. कॅन्सरचा हा प्रकार कधी प्रदूषण आणि स्मोकिंगमुळे अधिक पसरतो. 

उपाय

तंबाखू, सिगारेटची सवय मोडायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:ला कामात व्यस्त करुन घेणे. लोकांसोबत वेळ घालवा, सतत पाणी प्यायला हवे, टीव्ही बघा. हे सगळं करताना काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण याने तुमचं मन डालव्हर्ट होईल आणि तुमची सवय मोडण्यास मदत होईल. 

अश्वगंधा सिगरेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी मदत करतं. हे अड्रेनल ग्लँडसाठी एका टॉनिकप्रमाणे काम करतं आणि रक्तप्रवाहामध्ये कोर्टिसोलचा स्तर निर्माण करण्यासाठी मदत करतात. अश्वगंधा शारीरिक आणि भावनिक तणावासोबत शरीरात होणाऱ्या अन्य आजारांच्या लक्षणांना संतुलित करतात. हे  विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. तसेच फुफ्फुसांमधील विषारी पदार्थ स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दूधामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर एकत्र करून प्यायल्याने धुम्रपान करण्याची इच्छा कमी होते. तसचं दररोज व्यायाम करा. जास्तीत जास्त पाणी प्या. सिगारेटचं सेवन करू नका. 

इन 6 कारणों से किसी को भी हो सकता है फेफड़ों का कैंसर, जानें लक्षण और बचाव

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळी जर शिटीसारखा आवाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आवाजामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरप्रमाणेच इतरही आजारांचा धोका असतो. जर तुम्हाला खोल किंवा लांब श्वास घेताना त्रास होत असेल तर हे फुफ्फुसांमध्ये घाण जमा असण्याचं कारण असू शकतं. ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

चेहरा आणि घश्यामध्ये सूज असणंही लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर अचानक घसा किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सर वाढल्याने सांधेदुखी, पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास होतो. अनेकदा हाडं फ्रॅक्चरही होतात. 

जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबतच पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास सतावत असेल तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. कफ झाला असेल आणि खूप औषधं घेऊनही तो बरा होत नसेल. तर हे संक्रमण असू शकतं. याव्यतिरिक्त कफ संबंधातील इतर समस्या म्हणजे थुंकीतून रक्त पडतं असेल तर वेळीच तपासणी करून घ्या. 

फुफ्फुसांच्या कॅन्सरचा परिमाण मेंदूवरही होतो. अशा परिस्थितीमध्ये जर सतत डोकेदुखीचा त्रास सतावतो. अनेकदा शरीरातील कॅल्शिअमची मात्रा अधिक होते. ज्यामुळे रक्त गोठण्यास सुरुवात होते. हे देखील लंग कॅन्सर होण्याचं एक कारण असू शकतं. 

हे पण वाचा:

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

अवघ्या जगाचे डोळे असलेल्या लसीची चाचणी अपूर्ण; तरीही उत्पादनाला सुरूवात?, वाचा WHO ची प्रतिक्रिया

Web Title: lung cancer 6 big reasons for disease know symptoms causes and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.