कांस्याच्या वाटीने तळपायांची मालिश का केली जाते? जाणून घ्या फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:57 IST2024-06-28T13:56:18+5:302024-06-28T13:57:01+5:30
Bronze Foot Massage Benefits: कांस्य हे तीन वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलं जातं. ज्यात जास्त तांबे असतं. त्याशिवाय झिंक आणि कथीलही असतं. याने तळपायांची मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात.

कांस्याच्या वाटीने तळपायांची मालिश का केली जाते? जाणून घ्या फायदे...
Bronze Foot Massage Benefits: आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत जे तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात. यातीलच एक उपाय म्हणजे कांस्याच्या वाटीने तळपायांची मसाज करणे. अनेकांना याबाबत फार माहिती नाही, पण याचे फायदे वाचाल तर तुम्ही अवाक् व्हाल. कांस्य हे तीन वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलं जातं. ज्यात जास्त तांबे असतं. त्याशिवाय झिंक आणि कथीलही असतं. याने तळपायांची मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात.
कांस्याच्या वाटीने तळपायांची मालिश केल्याने अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. याने पायांची शक्ती, सहनशक्ती, मन आणि शरीराचं संतुलन चांगलं राहतं.
कशी कराल मालिश?
पायांची मालिश करण्यासाठी ज्या गोष्टीचा वापर केला जातो त्याला कांस्याची वाटी म्हटलं जातं. कांस्याच्या वाटीने पायांचा मालिश करण्याआधी पाय स्वच्छ धुवून घ्या. यानंतर तळपायांच्या काही विशेष भागांवर चांगली मालिश करा. मालिश करताना कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. पायांची मालिश करताना जरा जोर देऊन करा. तेल किंवा तूप लावून वाटीने मालिश करा आणि २ तासांनंतर पाय धुवून घ्या.
कांस्याच्या वाटीने मालिश करण्याचे फायदे
- कांस्यामधील तांब्यामुळे वेदना आणि सूज कमी होते.
- कांस्याच्या वाटीने पायांची मालिश केल्याने इम्यूनिटीही वाढते.
- असं मानलं जातं की, कथिलमुळे झोप न येण्याची समस्याही दूर होते.
- सोबतच डोकेदुखी आणि पचनासंबंधी समस्याही याने दूर होतात.
- या वाटीने मालिश केल्याने ब्लड प्रेशर योग्य राहतं. तसेच याने बॉडी डिटॉक्स करण्यासही मदत मिळते.
- तळपायांवर योग्य ठिकाणी एक्यूप्रेशर मिळाल्याने स्ट्रेस कमी करण्यासही मदत मिळते. ज्यामुळे मेंदुला आराम मिळतो.
- गुडघे आणि जॉइंट्सच्या वेदना कमी होतात.
- याने मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच थकवाही कमी होतो.
- पायांवरील सूज कमी होते.
- टाचांवर आलेल्या भेगा दूर करण्यास मदत मिळते.
- इतकंच नाही तर डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यांखालील काळे डागही दूर होतात.