शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

AI च्या अधिक वापराने मेंदूवर काय प्रभाव पडतो? रिसर्चमधून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:20 IST

AI Impact on Mental Health : AI संदर्भात झालेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI चा अति वापर केल्यास माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

AI Impact on Mental Health : AI आल्यापासून लोकांची अनेक कामे सोपी झाली आहेत. जास्तीत जास्त लोक महत्वाची माहिती मिळवण्यासाठी, ऑफिसची कामे करण्यासाठी एआयचा वापर करताना दिसतात. आजच्या काळात बहुतेक लोक छोट्या असोत वा मोठ्या गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी AI चा वापर करतात. खासकरून ChatGPT चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, AI संदर्भात झालेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI चा अति वापर केल्यास माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

संशोधनात काय समोर आले?

Massachusetts Institute of Technology Media Lab येथे 54 विद्यार्थ्यांवर एक अभ्यास करण्यात आला. त्यांच्या मेंदूच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी त्यांना निबंध लिहायला सांगितले गेले. यासाठी विद्यार्थ्यांना तीन गटांमध्ये विभागले गेले. एका गटाने ChatGPT चा वापर केला, दुसऱ्या गटाने Google चा वापर केला आणि तिसऱ्या गटाने कोणतीही बाह्य मदत घेतली नाही. यानंतर संशोधकांनी त्यांच्या लेखनाची आणि मेंदूच्या क्रियाशीलतेची तुलना केली.

AI वापरणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत निष्कर्ष

ChatGPT चा वापर करून निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याच्या कौशल्यात काही प्रमाणात कमतरता दिसून आली. त्यांच्या लेखनात मौलिकतेचा अभाव होता. तसेच, त्यांना स्वतः लिहिलेला निबंध लक्षात ठेवण्यात अडचण आली. संशोधकांच्या मते, त्यांनी स्वतःच्या मेंदूचा कमी वापर केला.

Google वापरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय दिसलं?

Google चा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मेंदूची सक्रियता जास्त आढळली. त्यांनी माहिती शोधून त्यावर स्वतःचे विचार मांडले, त्यामुळे त्यांची क्रिएटिविटी टिकून राहिली.

कोणताही डिजिटल टूल न वापरणारे विद्यार्थी

ज्या विद्यार्थ्यांनी कोणतीही डिजिटल मदत न घेता निबंध लिहिला, त्यांच्यात सर्वाधिक मेंदूची सक्रियता दिसून आली. त्यांच्या क्रिएटिविटी आणि मेमरीमध्ये चांगला समतोल होता. त्यांनी लिहिलेला निबंध लक्षात ठेवण्यातही त्यांना अडचण आली नाही.

एकंदर काय तर AI उपयोगी आहे, पण त्याचा अति वापर टाळणे आवश्यक आहे. स्वतः विचार करून काम केल्यास मेंदू अधिक सक्रिय राहतो. AI ला सहाय्यक म्हणून वापरा, पर्याय म्हणून नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : AI overuse impacts brain function: Research reveals alarming information.

Web Summary : Research reveals excessive AI use reduces thinking skills and originality. Students using ChatGPT struggled with learning and memory. Google users showed more brain activity. Those without digital aids had the best cognitive balance; use AI wisely.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सHealth Tipsहेल्थ टिप्स