शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

केवळ पोटावरील चरबी कमी करता येते का? जाणून घ्या उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:31 IST

Belly Fat : पोटावरील चरबीचा अनेकांना सर्वात जास्त त्रास होतो. अलिकडे ही समस्या अधिक बघायला मिळते.

Belly Fat : शरीरात फॅट म्हणजेच चरबी जमा होणं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा लठ्ठपणा वेगवेगळा असतो. कुणाला पोटावरील चरबीचा लठ्ठपणा असतो तर कुणाच्या संपूर्ण शरीरात फॅट आणि लठ्ठपणा असतो. योग्य शरीरासाठी आणि आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात फॅट असणं गरजेचं आहे. पण फॅट जास्त असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटावरील चरबीचा अनेकांना सर्वात जास्त त्रास होतो. अलिकडे ही समस्या अधिक बघायला मिळते.

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जे लोक पोटावरील चरबीमुळे हैराण आहेत, ते वजन कमी करण्याचा विचार करतात. पण त्यांना हा प्रश्न पडतो की, काय केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे? हा असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. पण याबाबत काही रिसर्च करण्यात आलेत. जर तुम्हीही पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यापेक्षा केवळ पोटावरील कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हे शक्य आहे का? हे जाणून घेऊ.

केवळ पोटावरील चरबी कमी करता येते का?

जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी एखादा एरिया सिलेक्ट करतो तेव्हा त्याला स्पॉट रिडक्शन असं म्हटलं जातं. अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, कधी कधी स्पॉट रिडक्शन वेट लॉस प्लॅन यशस्वी होत नाही.

जर्नल ऑफ स्ट्रेंथ कंडीशनिंग रिसर्चमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, ६ आठवडे ऍब्स वर्कआउट सुद्धा व्यक्तीच्या पोटावरील चरबी कमी करू शकत नाही. एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, १२ आठवडे हाताचे वर्कआउट करूनही हातावरील चरबी कमी झाली नाही. तर हातावरील चरबी सैल होती ती टाइट झाली होती. या दोन्ही रिसर्चमधून हे समोर येतं की, अनेक केसेसमध्ये वर्कआउट किंवा एक्सरसाइज सुद्धा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत नाही. खासकरून पोटावरील चरबी करण्याबाबत असं होतं.

तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर आधी शरीराचा मेटाबॉलिक रेट योग्य करा. चांगल्या मेटाबॉलिक रेटसाठी नियमित एक्सरसाइज करणे सर्वात चांगलं मानलं जातं. एक्सपर्ट सांगतात की, बेली फॅट म्हणजेच पोटवरील चरबी कमी करण्यासाठी मेटाबॉलिक रेट योग्य ठेवणं गरजेचं असतं. 

नेमकं काय होतं?

मेटाबॉलिक रेटमुळे पोटावरील चरबी कमी कशी होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करते तेव्हा शरीरात एक हार्मोन रिलीज होतं. हा हार्मोन मेटाबॉलिक रेटचा वेग वाढवतो आणि याने शरीरात जमा चरबी कमी होऊ लागते. पोट, हात आणि छातीवरील चरबी मेटाबॉलिक रेट वाढल्याने कमी होऊ शकते. 

पोट आत घेण्यासाठी एक्सरसाइज

अनेक रिसर्च सांगतात की, एरोबिक, रनिंग करणे, स्वीमिंग करणे, सायकलिंग या एक्सरसाइज संपूर्ण शरीर फिट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगल्या एक्सरसाइज मानल्या जातात. त्यासोबतच या एक्सरसाइजच्या मदतीने पोटावरील चरबीही कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य